आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिगबुल यांची बिग डील:आकाशाने 72 बोइंगची ऑर्डर दिली; ती गो, विस्तारा व एअर एशियापेक्षा जास्त

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • झुनझुनवाला यांनी केला 67,000 कोटींचा करार

प्रख्यात गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची विमान कंपनी आकाशा एअरने मंगळवारी अमेरिकी एरोस्पेस कंपनी बोइंगला ७२ ‘७३७ मॅक्स’ विमानांची ऑर्डर दिली. हा सौदा सुमारे ६७ हजार कोटी रुपयांचा असेल. देशातील एअरलाइन्सपैकी फक्त इंडिगो, एअर इंडिया व स्पाइसजेटकडेच यापेक्षा जास्त विमानांचा ताफा आहे. त्यातही स्पाइस जेटकडे ७३७ आकाराची फक्त ५९ विमाने आहेत. उर्वरित विमाने छोटी आहेत. या सौद्यासोबतच आकाशाने भारतीय विमानन उद्योगात आपण मोठी झेप घेणार असल्याचे दाखवून दिले आहे.

एव्हिएशन एक्स्पर्ट हर्षवर्धन म्हणाले, गेल्या २-३ वर्षांत सरकारी धोरण आणि कोविडमुळे भारताच्या हवाई वाहतूक उद्योगाला मोठ्या घसरणीचा सामना करावा लागला होता. आता उद्योग वेगाने सावरत आहे. भारत जगातील सर्वात वेगाने विस्तारणारी एव्हिएशन बाजारपेठ आहे. त्याकडे पाहून आकाशाने हे पाऊल उचलले आहे. सर्व विमानांची डिलिव्हरी होण्यात ३-४ वर्षे लागतील. यादरम्यान कंपनी विस्तार करेल. नागरी विमानन मंत्रालयाने गेल्या महिन्यात आकाशा एअरला मंजुरी दिली होती. हर्षवर्धन म्हणाले, बोइंगसाठीही हा सौदा महत्त्वाचा आहे. जेट बंद झाल्यानंतर भारतात बोइंगची बाजारपेठ घटली होती. आकाशासोबत बोइंगचीही भारतात पुन्हा एंट्री होत आहे. एका अंदाजानुसार, २० वर्षांत दक्षिण आशियन देशांत २२०० नव्या विमानांची गरज असेल. त्यातील निम्म्यापेक्षाही जास्त विमानांची विक्री भारतात होईल.

यापैकी कुणाचा वाटा हिसकावणार आकाशा?
एअरलाइन मार्केट शेअर
इंडिगो 56.2%
एअर इंडिया 12.1%
विस्तारा 8.7%
एअरएशिया 5.8%
स्पाइस जेट 8.5%
गो फर्स्ट 8.2%
इतर 0.5%

बातम्या आणखी आहेत...