आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पष्टोक्ती:रतन टाटा म्हणाले- जेनेरिक आधार कंपनीची 50 टक्के भागिदारी खरेदी केलेली नाही, केवळ छोटीशी गुंतवणूक केली

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • दोन वर्षांपूर्वी अर्जुन देशपांडेंनी सुरू केली हाेती जेनेरिक आधार नावाची कंपनी

काही दिवसांपूर्वीच टाटा ग्रुप चेअरमन रतन टाटा यांनी मुंबईतील जेनेरिक आधार फार्मासी कंपनीची 50 टक्के भागिदारी विकत घेतल्याचे वृत्त समोर आले होते. कंपनीचे फाउंडर अर्जुन देशपांडे यांनी या डीलला अधिकृत दुजोरा दिला होता. परंतु, डीलची किंमत सांगण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यातच खुद्द रतन टाटा यांनी ट्विट करून आपण या कंपनीची 50 टक्के भागिदारी घेतलेली नाही असे स्पष्ट केले आहे. या कंपनीमध्ये त्यांनी केवळ छोटीशी गुंतवणूक केली असे म्हटले आहे.

जेनेरिकमध्ये सध्या ५५ कर्मचारी

मुंबई, जेनेरिकच आधारामध्ये सध्या ५५ कर्मचारी मुंबई, पुणे, बंगळुरू आणि ओडिशात सुमारे ३० रिटेलर या कंपनीशी संबंधित आहेत. कंपनीच्या ५५ कर्मचाऱ्यांमध्ये फार्मासिस्ट, आयटी अभियंते आणि मार्केटिंग व्यावसायिकांचा समावेश आहे. आमच्या व्यवसायाचा विस्तार महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्लीत करायचा आहे. वर्षाच्या आत आमची योजना जेनेरिकच आधार अंतर्गत १००० फ्रॅन्चायझी औषधी दुकाने सुरू करायची आहेत, असे देशपांडे म्हणाले होते.

यापूर्वी असे सांगण्यात आले होते की या कंपनीत त्यांनी खासगी स्वरुपात गुंतवणूक केली. याचा टाटा ग्रुपशी संबंध नाही. रतन टाटा यांनी यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे अनेक स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामध्ये ओला, पेटीएम, स्नॅपडील, क्योरफिट, अर्बन लॅडर, लेन्सकार्ट आणि लायब्रेट इत्यादींचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...