आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Ratan Tata On Cost Cutting | Layoffs During Pandemic Shows India Inc's Lack Of Empathy: Ratan Tata

नोकर कपातीवर रतन टाटा म्हणाले:संकटाच्या काळात आपण आपल्या कर्मचार्‍यांशी असे वागता, हीच तुमची नैतिकता आहे का?

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकांना नोकरीवरून काढल्याने तुमची समस्या सुटणार नाही : रतन टाटा
  • लोकांना नोकरीवरून काढल्याने तुमची समस्या सुटणार नाही : रतन टाटा

कोरोनामुळे अनेक कंपन्यांना नुकसान होत आहे. अशात काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहेत. यावर टाटा समुहाचे संरक्षक रतन टाटा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुरुवारी एका मुलाखती दरम्यान ते म्हणाले की, कोरोनाव्हायरसच्या कठीण काळात कंपन्यांवर कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. संकटाच्या काळात आपण आपल्या कर्मचार्‍यांशी असे वागता, हीच तुमची नैतिकता आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. 

रतन टाटा 'यूअरस्टोरी'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, "उद्योजक आणि कंपन्यांसाठी दीर्घकाळ काम करणे आणि उत्तम कामगिरी करण्यासाठी कर्मचार्यांची संवेदनशीलता सर्वोपरि असते. साथीच्या काळात तुम्ही तुमच्या कर्मचार्‍यांशी असे वागता, ही तुमची नैतिकता आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

व्हायरस येताच हजारो लोकांनी नोकर्‍या गमावल्या

ते म्हणाले की, "जेव्हा देशात विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा हजारो लोकांना काढून टाकण्यात आले. यामुळे तुमच्या समस्येचे निराकरण होईल का? मला नाही वाटत की असे होईल, कारण तुम्हाला व्यवसायात नुकसान झाले आहे, अशात लोकांना नोकरीवरून काढणे योग्य नाही. उलट त्या लोकांबद्दल आपली जबाबदारी असते."

''आपण स्वतःला असे म्हणत वेगळे नाही करू शकत की, आम्ही असे करत राहू, कारण आम्ही आमच्या भागधारकांसाठी असे करत आहोत. तुम्ही या वातावरणात तोपर्यंत टिकणार नाहीत, जोपर्यंत तुम्ही संवेदनशील होत नाहीत, यामुळे सर्वात आधी लोकांनी त्या कार्यस्थळाबाबत चिंतित असले पाहिजे.'' 

कोरोनापासून बचावासाठी कोणतीही जागा नाही

ते म्हणाले की, "तुम्हाला लपण्यासाठी किंवा पळण्यासाठी कोणतीही जागा नाही. तुम्ही जेथे जाल तिथे कोरोना महामारीमुळे नुकसान होईल. यामुळे तुम्ही परिस्थिती स्वीकारणे चांगले राहील. तुमच्यामुळे जे काही होईल, त्या गोष्टींमध्ये बदल करावा लागेल."

कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराने बर्‍याच क्षेत्रातील व्यवसायांवर परिणाम केला आहे. त्यांच्यापैकी बर्‍याचजणांनी व्यवसायात रहाण्यासाठी कर्मचाऱ्यांची कपात आणि वेतन कपातीचा आधार घेतला. कोरोनाचा वाढत्या प्रकोपामुळे स्टार्टअप इकोसिस्टममधून अनेक यूनिकॉर्न (7.4 हजार कोटी रुपयांचे मूल्य असणारे स्टार्टअप्स) जसे की, ओला, ओयो, स्विगी आणि झोमॅटो यांना आपल्या कर्मचाऱ्यांसोबत व्यवसाय देखील कमी करावा लागला. 

तुमच्यासाठी काम करणाऱ्या लोकांना तुम्ही सोडले 

रतन टाटा यांनी कोरोनामुळे प्रवासी आणि रोजंदारीवरील मजुरांच्या स्थितीविषयी बोलताना म्हटले की, उत्पन्नाचा काही स्रोत नसल्यामुळे लॉकडाऊनमध्ये उन्हातान्हात कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीशिवाय घरी परतले.

ते म्हणाले की, "आपल्यासाठी कोणतेही काम नाही आणि आपल्याला घरी पाठविण्याचा कोणताही मार्ग नाही असे देशाच्या सर्वात मोठ्या कामगार दलाला सांगितले गेले. त्यांच्या जेवणासाठी अन्न नाही, राहण्याची जागा नाही. याबाबत कोणाला दोष देण्याची इच्छा नाहीये परंतु हा पारंपरिक दृष्टीकोन होता, आता ते चित्र बदलले आहे. असे करणार तुम्ही कोण?" असा प्रश्न रतन टाटा विचारला आहे. 

"हे तेच लोक आहेत ज्यांनी तुमच्यासाठी काम केले. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत तुमची सेवा केली. यामुळे तुम्ही त्यांना असे वाऱ्यावर सोडता? तुम्ही तुमच्या श्रमशक्तीशी असे वागता, ही तुमच्या नैतिकतेची व्याख्या आहे का?"

अशा परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास लोकांना अधिक चांगली समज मिळेल

ते म्हणाले की, "मला आशा आहे की आम्ही पुन्हा या प्रकारची परिस्थिती पाहणार नाही, परंतु जर आम्हाला पुन्हा या प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागला तर मला वाटते की लोक काय करू शकतात याबद्दल तुम्हाला माहीत असेल."