आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:कुटुंबप्रमुखाला माहिती हवी असेल तर त्यात चुकीचे काय? कंपनीवर कुटुंबप्रमुखाचेच नियंत्रण असते : सरन्यायाधीश

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टाटा सन्समध्ये मिस्त्री कुटुंबाचा 18.5% हिस्सा, त्याचे मूल्य 1.3 लाख कोटी रु.

सुप्रीम कोर्टात टाटा सन्स विरुद्ध सायरस मिस्त्री वादावर अंतिम सुनावणी सुरू आहे. सोमवारी सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी शापूरजी पलोनजी (एसपी) ग्रुपचा युक्तिवाद ऐकल्यानंतर म्हटले-‘जर कुटुंबप्रमुखाला काही माहिती हवी असेल किंवा एखादा निर्णय नियंत्रित करण्याची इच्छा असेल तर त्यात काय चुकीचे आहे? ही खासगी कंपनी आहे. कंपन्यांवर बहुधा कुटुंबप्रमुखाचेच नियंत्रण असते आणि तेच दिशानिर्देश देतात. उदाहरणार्थ बिर्ला आणि टाटा यांच्याकडे अशीच संरचना आहे. तुमच्याकडेही (एसपी) असू शकते.’

तत्पूर्वी एसपी ग्रुपतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ सी. ए. सुंदरम म्हणाले की, ‘ही कंपनी शेअरधारकांसह ६५ लाख कोटी रुपयांच्या अनेक कंपन्यांची मालक आहे. त्यामुळे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हवे. जर त्यांना कौटुंबिक प्रकरण ठेवायचे होते, तर त्यांनी ते सार्वजनिक करण्याऐवजी तसेच राहायला पाहिजे होते. एक सार्वजनिक धर्मार्थ ट्रस्ट कायदेशीररीत्या अशा कंपन्या चालवू शकत नाही, त्यामुळे त्या बोर्डाद्वारे चालवण्याची गरज आहे. ते हा दावा करण्यासाठी आर्टिकल्सचा वापर करू शकत नाही की, आमच्याकडे कंपनीच्या प्रकरणांचे पूर्ण अधिकार आहेत.’ सुंदरम यांनी बोर्डाचे वर्चस्व दाखवण्यासाठी टाटा सन्सच्या आर्टिकल्सचा हवाला दिला. ते म्हणाले- घटनेचे कलम १२१ अ हे सुनिश्चित करण्यासाठी आहे की, काही प्रकरणांना अवश्यपणे बोर्डाची मंजुरी मिळावी. एसपी ग्रुपने चांगल्या संबंधांमुळे आर्टिकल १२१ अ च्या बाजूने मत दिले होते. आर्टिकल्सचा वापर आपल्याविरोधात होईल, अशी कल्पना एसपी ग्रुपने केली नव्हती.

सरन्यायाधीश बोबडे यांनी सुनावणी सुरू होताच पक्षकारांच्या वकिलांना सांगितले की, माझी मुले मुंबईत वकिली करतात. ते एसपी ग्रुपच्या सहायक कंपनीसाठी एका प्रकरणात हजर होत आहेत. त्यामुळे कोणाला काही आक्षेप आहे का? कोणीही आक्षेप घेतला नाही. त्यानंतरच सुनावणी झाली.

टाटा सन्समध्ये मिस्त्री कुटुंबाचा 18.5% हिस्सा, त्याचे मूल्य 1.3 लाख कोटी रु.
पलोनजी मिस्त्रींचे पुत्र सायरस मिस्त्रींना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. वाद कोर्टात गेला. कंपनी लॉ अपिलीय ट्रिब्युनलने मिस्त्रींच्या बाजूने निकाल दिला. त्याला टाटा सन्सने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. मिस्त्री कुटुंबाचा टाटा सन्समध्ये १८.५% हिस्सा आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser