आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाढत्या महागाईमुळे चिंतेत असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केली आहे. त्यानुसार रेपो दर 4.40% वरून 4.90% पर्यंत वाढवला आहे. म्हणजेच तुमचे कर्ज महाग होणार आहे. त्यातुळे आता तुम्हाला जास्त ईएमआय भरावा लागेल. व्याजदरांबाबत निर्णय घेण्यासाठी 6 जूनपासून चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरू होती. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत व्याजदरांबाबत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
रेपो दर आणि तुमच्या ईएमआयचा संबंध
रेपो रेट म्हणजे ज्या दारावर बँकांना RBI कडून कर्ज मिळते, तर रिव्हर्स रेपो दर हा दर आहे ज्यावर RBI बँकांना पैसे ठेवण्यावर व्याज देते. जेव्हा RBI रेपो दर कमी करते, तेव्हा बँका देखील बहुतेक वेळा व्याजदर कमी करतात. म्हणजेच ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचे व्याजदर कमी होतात, त्याचप्रमाणे ईएमआयही कमी होतो. त्याचप्रमाणे, जेव्हा रेपो दरात वाढ होते, तेव्हा व्याजदरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांसाठी कर्ज महाग होते. कारण व्यापारी बँकांना सेंट्रल बँकेकडून जास्त दराने पैसे मिळतात, ज्यामुळे त्यांना दर वाढवावे लागतात.
0.50% दर वाढीमुळे किती फरक पडेल?
समजा सुदर्शन नावाच्या व्यक्तीने 6.5% दराने 20 वर्षांसाठी 10 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे. त्याच्या कर्जाचा ईएमआय 7,456 रुपये आहे. 20 वर्षात त्याला या दराने 7,89,376 रुपये व्याज द्यावे लागेल. म्हणजेच त्याला 10 लाखांऐवजी एकूण 17,89,376 रुपये द्यावे लागतील.
सुदर्शनचे कर्ज घेतल्यानंतर एका महिन्यानंतर, RBI ने रेपो दरात 0.50% वाढ केली. या कारणास्तव, बँका व्याजदरात 0.50% वाढ करतात. आता जेव्हा सुदर्शनचा मित्र त्याच बँकेत कर्ज घेण्यासाठी पोहोचतो तेव्हा बँक त्याला 6.5% ऐवजी 7% व्याजदर देते.
सुदर्शनचा मित्र सुद्धा 10 लाख रुपये फक्त 20 वर्षांसाठी कर्ज घेतो, पण त्याचा EMI 7753 रुपये होतो. म्हणजेच सुदर्शनच्या ईएमआयपेक्षा 297 रुपये जास्त. यामुळे सुदर्शनच्या मित्राला 20 वर्षात एकूण 18,60,717 रुपये द्यावे लागतील. ही रक्कम सुदर्शनच्या रकमेपेक्षा 71 हजार जास्त आहे.
कर्जाची रक्कम (रु. मध्ये) | मुदत | व्याजदर (%मध्ये) | हप्ता (ईएमआय रु. मध्ये) | एकूण व्याज (रु. मध्ये) | परतफेड करण्याची एकूण रक्कम (रु. मध्ये) |
10 लाख | 20 वर्षे | 6.50 | 7,456 | 7.89 लाख | 17.89 लाख |
10 लाख | 20 वर्षे | 7.00 | 7,753 | 8.60 लाख | 18.60 लाख |
गेल्या मिटिंमध्ये वाढवले होते दर
ब्लूमबर्गने सर्वेक्षण केलेल्या 41 पैकी 17 अर्थशास्त्रज्ञांनी रेपो दर 0.50% ते 4.9% ने वाढवण्याचा अंदाज व्यक्त केला होता. काही अर्थतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, आरबीआय हळूहळू रेपो दर 5.15% च्या प्री-कोविड पातळीपेक्षा वाढवेल. पत धोरण आढाव्याची बैठक दर दोन महिन्यांनी आयोजित केली जाते, मात्र गेल्या महिन्यात RBI ने 2 आणि 3 मे रोजी आपत्कालीन बैठक बोलावली आणि रेपो दर 4% वरून 4.40% पर्यंत वाढवला. हा बदल 22 मे 2020 नंतर रेपो दरात करण्यात आला. या आर्थिक वर्षाची पहिली बैठक 6-8 एप्रिल रोजी झाली.
RBI वर दर वाढवण्यासाठी दबाव
मध्यवर्ती बँकेने या वर्षी 4 मे रोजी रेपो दरात शेवटची वाढ केली होती आणि तेव्हापासून देशात आणि जगात 4 मोठे बदल झाले आहेत:
आधीच होता दर वाढण्याचा अंदाज
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अलीकडेच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'आरबीआय पुढील काही बैठकांमध्ये किमान दर वाढवू शकते. ते म्हणाले होते की, मी स्वतः माझ्या इतिवृत्तांत सांगितले आहे की, मे महिन्यात झालेल्या बैठकीचे एक कारण हे होते की, आम्हाला जूनमध्ये अधिक कठोर कारवाई नको होती. ते म्हणाले होते, 'रेपो दरात थोडी वाढ होईल, पण किती असेल ते सांगता येणार नाही...'
CRR देखील 0.50% ने वाढवला होता
मे मध्ये झालेल्या बैठकीत RBI ने कॅश रिजर्व्ह रेश्यो म्हणजेच रोख राखीव प्रमाण (CRR) 0.50% ने वाढवले. हे 4.5% पर्यंत वाढले आहे. CRR ही अशी रक्कम आहे जी बँकांना नेहमी RBI कडे ठेवावी लागते. मध्यवर्ती बँकेने CRR वाढवण्याचा निर्णय घेतल्यास, वितरणासाठी बँकांकडे उपलब्ध असलेली रक्कम कमी होते. प्रणालीतील तरलता कमी करण्यासाठी CRR चा वापर केला जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.