आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिझर्व्ह बँकेच्या नाणेनिधी धोरण समितीचे सदस्य या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच महागाई रोखण्याच्या मार्गांवर विचारमंथन करत आहेत. धोरणात्मक दर वाढवायचे की नाही, या प्रश्नाचे उत्तर ते शोधत नाहीत. त्यापेक्षा दरात किती वाढ करणे योग्य ठरेल हे निश्चित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
ब्लूमबर्गने सर्वेक्षण केलेल्या ४१ पैकी १७ अर्थशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, एमपीसी बुधवारी रेपो रेट ०.५०% वाढवून ४.९ पर्यंत करू शकते. परंतु इतर अर्थशास्त्रज्ञांचे मत बरेच वेगळे आहे. त्यानुसार, बेंचमार्क व्याजदर ०.२५% पासून ०.७५ % पर्यंत वाढवला जाऊ शकतो. सतत वाढणाऱ्या महागाईला लगाम घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात पुढील आढावा बैठकीपूर्वीच रेपो दरात अचानक ०.४०% वाढ केली होती.
रेपो दर कोविड पूर्वच्या वर जाऊ शकतो
सर्वेक्षण केलेल्या काही विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, रिझर्व्ह बँक अखेरीस रेपो दर ५.१५ टक्क्यांच्या काेविडपूर्व पातळीच्या वर नेईल. याचा अर्थ धाेरणात्मक दरांमध्ये ०.७५ % वाढ करण्यास जागा आहे. आॅब्झर्व्हेटरी ग्रुपचे वरिष्ठ भारत विश्लेषक अनंत नारायण म्हणाले की, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास रेपो दर ५.१५% वर मर्यादित ठेवण्याचे वचन देण्यास टाळत करत आहेत. याचा अर्थ रेपो दर या मर्यादेच्या वरही घेतला जाऊ शकतो.
धाेरणात्मक दरवाढ काळाची गरज
डॉइश बँक एजीचे भारतातील मुख्य अर्थतज्ज्ञ काैशिक दास यांच्या म्हणण्यानुसार सतत वाढणारी महागाई लक्षात घेता रिझर्व्ह बँकेला व्याजदर वाढ करणे चालू ठेवावे लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेते या वेळी निर्णायक कृती केल्यास महागाई आटोक्यात येईल, याकडेही दास यांनी लक्ष वेधले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.