आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतधोरण आढावा बैठक:सलग सातव्यांदा प्रमुख व्याजदर जैसे थे, मात्र चालू वर्षासाठी महागाई दर अंदाज वाढवला

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पतधोरण आढाव्याअंतर्गत शुक्रवारी धोरणात्मक व्याजदरांत सलग सातव्यांदा कोणताही बदल केला नाही. रेपो रेट ४% आणि रिव्हर्स रेपो रेट ३.३५% वर स्थिर ठेवला. मात्र, चालू वित्त वर्ष २०२१-२२ साठी किरकोळ महागाई दराचा अंदाज ०.६% वाढून ५.७% केला. याआधी जूनमध्ये केंद्रीय बँकेने हा ५.१% ठेवण्याचा अंदाज व्यक्त केला होता. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आर्थिक चलन धोरण समितीच्या(एमपीसी) तीनदिवसीय बैठकीनंतर शुक्रवारी याच्या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कोरोना महारोगराईच्या दुसऱ्या लाटेतून देशाची अर्थव्यवस्था सुधारत आहे. मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन बिघडले आहे. आरबीआयचा प्रयत्न मागणी आणि पुरवठा साखळीस जास्त बळकटी आणि प्रभावी बनवण्याची आहे. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये आर्थिक हालचालीत सुधारणा चांगल्या राहिल्या. किरकोळ महागाई दराची अंदाज वाढ पुरवठ्यात अडथळा येणे, कच्च्या तेलाच्या उच्च किमती आणि कच्च्या मालाची भाववाढ लक्षात घेऊन केली आहे. अर्थव्यवस्था कोविड-१९ मधून पूर्णपणे सुधारू शकली नाही. महामारीच्या तिसऱ्या लाटे प्रति जागरूक राहण्याची गरज आहे.

विकासदराचा अंदाज ९.५% कायम: रिझर्व्ह बँकेने चालू वित्त वर्षासाठी देशाच्या विकासदराच्या अंदाजास ९.५% वर कायम ठेवला. मात्र, वेगवेगळ्या तिमाहीसाठी या अंदाजात बदल केला आहे. जून तिमाहीसाठी वृद्धीदराचा अंदाज १८.५% पेक्षा वाढून २१.४% केला आहे. सप्टेंबर तिमाहीसाठी वृद्धीदराचा अंदाज ७.९% घटवून ७.३% केला आहे.

क्रूड तेलाच्या किमती वाढल्याने महागाई अंदाजात वृद्धी
आरबीआय गव्हर्नरांनी सांगितले की, पुरवठ्यात व्यत्यय आल्याने कच्चे तेलाच्या चढ्या किमती आणि कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने किरकोळ महागाईचा अंदाज वाढवला आहे.जूनमध्ये किरकोळ महागाई दर ६.२६% च्या पातळीवर नोंदली होता. मेमध्ये ६.३% होता. आरबीआयने मागणी वाढण्याच्या हेतूने २२ मे २०२० रोजी धोरणात्मक दरांत बदल केला होता. सरकारने रिझर्व्ह बँकेला किरकोळ महागाई दर २% घट-वाढीच्या शक्यतेसोबत यास २-४% च्या कक्षेत ठेवण्याची जबाबदारी सोपवली आहे.

बातम्या आणखी आहेत...