आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • RBI Latest Report On Digital Payment And Cash Withdrawals; News And Live Updates

आरबीआय अहवाल:लोकांचा रोख रक्कम काढण्यावर भर, 17%हून जास्त फिरले चलन; डिजिटल पेमेंट्ससोबत नोटांचा वापरही वाढला

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपत्कालीन गरजांसाठी बँकांतून रोकड काढून जवळ ठेवणे लोकांना सोयीस्कर वाटले

कोरोना काळात डिजिटल देवाण-घेवाणीत वाढ झाली, मात्र लोकांचा रोकडवरील विश्वास जास्त राहिला. लॉकडाऊनदरम्यान वेळी-अवेळी गरज पूर्ण करण्यासाठी लोकांनी बँकांतून रोकड काढून जवळ ठेवणे पसंत केले. या कारणामुळे वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये नोटा सरासरीपेक्षा १७% जास्त फिरल्या. भारतीय रिझर्व्ह बँकेने वर्ष २०२०-२१ च्या आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली. अहवालानुसार, गेल्या वित्त वर्षात चलन फिरतीत सध्या बँक नोटेचे मूल्य १६.८% तर त्यांची संख्या वाढून ७.२% वाढली आहे.

रिझर्व्ह बँकेने सांगितले की, महामारीच्या सुरुवातीसोबत जेव्हा अर्थव्यवस्थेत रोकडची मागणी वाढली तेव्हा त्याने बँक नोटांची वाढती मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. देशात नवीन नोटांचा पुरवठा कायम राखण्यासाठी सर्व मूल्यवर्गाच्या बँक नोटांच्या करन्सी चेस्टमध्ये साठा ठेवणे निश्चित केले. करन्सी इन सर्कुलेशनमध्ये(सीआयसी) बँकनोट आणि नाणी दोन्हींचा समावेश आहे. गेल्या दशकात बँकनोटचे प्रमाण वाढून दुप्पट झालेे. २००९-१० मध्ये ५,६५४.९ कोटी नोटा चलनात होत्या. या ३१ मार्चला हा आकडा वाढून १२,४३६.७ कोटी नोटापर्यंत पोहोचला.

बनावट नोटा पकडण्यात २९.७% घट
रिझर्व्ह बँकेनुसार, वित्त वर्ष २०२०-२१ त देशाच्या अर्थव्यवस्थेवरील “घाव’ दिसतात. महामारीनंतर वृद्धीसाठी वैयक्तिक खर्च आणि गुंतवणुकीची महत्त्वाची भूमिका असेल. जीडीपीमध्ये त्याची हिस्सेदारी ८५% आहे.

नोटांच्या सुरक्षात्मक छपाईवर खर्च ९.११% झाला कमी
अहवालानुसार, बँकनोटेच्या सुरक्षात्मक छपाईवर १ जुलै २०२० पासून ३१ मार्च २०२१ दरम्यान ४,०१२.१ कोटी रु. खर्च झाले. हे याच्या मागील वर्षात समान अवधीदरम्यान खर्च झालेल्या रकमेत ९.११% कमी आहे.

५०० व २,००० नोटांचा हिस्सा २.३% वाढला
गेल्या ३१ मार्च २०२१ रोजी जेवढ्या नोटा चलनात होत्या, त्यांच्या मूल्यात ५०० व २,००० च्या नोटांची हिस्सेदारी वाढून ८५.७% वर पोहोचली . ३१ मार्च २०२० रोजी ही हिस्सेदारी ८३.४% होती. ३१ मार्च २०२१ रोजी जेवढ्या नोटा सर्क्युलेशनमध्ये होत्या, त्यात ३१.१% हिस्सेदारी ५०० रु. मूल्यवर्गाच्या नोट राहिल्या. २३.६% च्या हिस्सेदारीसोबत १० रु. मूल्यवर्गाची नोट दुसऱ्या क्रमांकावर राहिली.

बातम्या आणखी आहेत...