आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतीय रिजर्व बँके (RBI)च्या चलनविषयक धोरण समिती (MPC) ने रेपो रेट 4% कायम ठेवला आहे. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी 2021-22 साठी सकल घरगुती उत्पादन (GDP) मध्ये 10.5% ची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यावर आज 12 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. सहा सदस्यांची समिती असलेल्यी MPC ची बैठक बुधवारी सुरू झाली होती.
रेपो रेटमध्ये आतापर्यंत 115 बेसिस पॉइंटची कपात
जानकारांनी यापुर्ची आशा व्यक्त केली होती की, RBI रेपो रेटमध्ये कपात करणार नाही. रेपो रेटचा अर्थ RBI द्वारे बँकांना दिला जाणारा व्याज दर आहे. विशेष म्हणजे, 1 फेब्रुवारीला सादर झालेल्या बजेट 2021-22 नंतर RBI ची ही पहिलीच बैठक आहे. आरबीआयने मागच्या वर्षी फेब्रुवारीपासून आतापर्यंत रेपो रेटमध्ये एकूण 115 बेसिस पॉइंटच कपात केली आहे.
रिव्हर्स रेपो रेटदखील स्थिर
MPC ने मागच्या 3 वेळेस झालेल्या बैठकांमध्ये प्रमुख धोरणात्मक दरांमध्ये कोणतेच बदल केले नाही. सध्या रेपो रेट 4% आहे, जो 15 वर्षांच्या सर्वात कमीवर आहे. तर, RBI ने रिव्हर्स रेपो रेटदेखील 3.35% वर कायम ठेवला आहे. या दरावर बँक आपल्याकडे जमा असलेल्या पैशांना रिजर्व बँकेकडे जमा करते.
परदेशी गुंतवणूकदार देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवत आहेत
त्यांनी 2021-22 साठी GDP मध्ये 10.5% ची ग्रोथ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या चौथी तिमाहीसाठी ग्राहक (CPI) महागाई दर 5.2% राहण्याचा अंदाज आहे, जो आधी 5.8% होता. शक्तिकांता दास म्हणाले की, परदेशी गुंतवमूकदार भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.