आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरबीआयची आढावा बैठक सुरू:0.50% व्याजदर वाढवण्याची घोषणा होऊ शकते, यावर्षात आतापर्यंत 1.40% रेपो दरात वाढ

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ची आर्थिक आढावा बैठक आज म्हणजेच 28 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. ही बैठक 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. बैठक संपल्यानंतर आरबीआय 30 सप्टेंबर रोजी पतधोरण जाहीर करेल. तज्ज्ञांच्या मते, आरबीआयच्या चलनविषयक पुनरावलोकन धोरणाच्या बैठकीत रेपो दरात वाढीची घोषणा केली जाऊ शकते. आरबीआय रेपो दरात 0.50% पर्यंत वाढ करेल अशी अपेक्षा वर्तविली जात आहे. सद्या रेपो दर 5.40% आहे.

यावर्षी रेपो दरात 3 वेळा वाढ झाली
वाढत्या महागाईबद्दल चिंतेत असलेल्या आरबीआयने मे महिन्यात रेपो दरात 0.40%, जूनमध्ये 0.50% आणि ऑगस्टमध्ये 0.50% वाढ केली होती. अशाप्रकारे आरबीआयने मे महिन्यापासून रेपो दरात 1.40% वाढ केली आहे.

रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय ?

  • रिझर्व्ह बँकेकडून बँकांना ज्या दराने कर्ज दिले जाते. तो दर म्हणजे रेपो दर असतो. या कर्जातून बँका ग्राहकांना कर्ज देतात. कमी रेपो दर म्हणजे बँकेकडून अनेक प्रकारची कर्जे स्वस्त होतील. तर रिव्हर्स रेपो दर हा रेपो दराच्या अगदी उलट असतो.
  • रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रिझव्‍‌र्ह बँकेकडून बँकांनी ठेवलेल्या ठेवींवर मिळणारे व्याज. रिव्हर्स रेपो रेटद्वारे बाजारात तरलता, म्हणजेच रोख रक्कम नियंत्रित केली जाते. रेपो दर स्थिर राहणे म्हणजे बँकांचे कर्जाचे दरही स्थिर राहत असतात.

रेपो रेट वाढल्याने कर्ज महाग झाले आहे
जेव्हा RBI रेपो दर कमी करते, तेव्हा बँका देखील बहुतेक वेळा व्याजदर कमी करतात. म्हणजेच ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचे व्याजदर कमी होतात. त्याचप्रमाणे ईएमआयही कमी होतो. त्याचप्रमाणे, जेव्हा रेपो दरात वाढ होते, तेव्हा व्याजदरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांसाठी कर्ज महाग होते. कारण व्यापारी बँकांना RBI पेक्षा जास्त किमतीत पैसे मिळतात. ज्यामुळे त्यांना व्याजदर वाढवायला भाग पाडले जाते.

बातम्या आणखी आहेत...