आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घोषणा:5 ते 9 ऑक्टोबरपर्यंत असेल आरबीआयची महत्वपूर्ण बैठक; सर्वसामान्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय रिजर्व बँक (आरबीआय) ची आर्थिक धोरणांची आढावा बैठक 7, 8 आणि 9 ऑक्टोबरला होईल. आरबीआयने मंगळवारी एक प्रेस रिलीजमध्ये याची माहिती दिली. या बैठकीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास पत्रकार परिषद घेतील आणि या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देतील. उद्यापासून होणाऱ्या या 3 दिवसीय बैठकीत व्याज दर कपातीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

काय म्हटले आरबीआयने ?

RBI ने म्हटले की, आर्थिक धोरण समिती (एमपीसी) ची पुढील बैठक 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर, 2020 दरम्यान होईल. यापूर्वी आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या 3 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. तीन प्रतिष्ठीत इकोनॉमिस्ट आशिमा गोयल, जयंत आर वर्मा आणि शशांक भिडे यांना एमपीसीचे सदस्त म्हणून नियुक्त करण्यात आले.

पीएम मोदींच्या अध्यक्षतेत या नावांना मंजूरी

सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेत मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समिती (एसीसी) ने या नावांना मंजूरी दिली. RBI अधिनियमानुसार, तीन नवीन सदस्यांकडे चार वर्षांच्या अटी असतील. नवीन सदस्य चेतन घाटे, पामी दुआ आणि रवींद्र ढोलकिया यांच्या जागी येतील. त्यांना 29 सप्टेंबर, 2016 ला चार वर्षांसाठी पॅनेलमध्ये नियुक्त केले होते.

बातम्या आणखी आहेत...