आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावीन्यपूर्णतेला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध:फिनटेक कंपन्यांना इनाेव्हेशनमध्ये सहकार्य करेल आरबीआय

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, केंद्रीय बँक आर्थिक तंत्रज्ञान (फिनटेक)मध्ये नावीन्यपूर्णतेला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे. यासोबतच रिझर्व्ह बँक या प्रकरणात ग्राहकांच्या हिताची नेहमीच काळजी घेईल, असेही सांगितले. दास मंगळवारी म्हणाले, ‘आम्ही फिनटेक कंपन्यांना विश्वास देऊ इच्छित आहोत की, तुम्ही इनोव्हेशन करत राहा. यात आम्ही सहकार्य करू.’ दास मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक महोत्सवात बोलत होतो. याप्रसंगी ते म्हणाले की, तुम्ही इनोव्हेशनच्या दिशेने एक पाऊल टाकले तर आरबीआय दोन पाऊल टाकेल. आरबीआयच्या गव्हर्नरने सांगितले, फिनटेकच्या व्यवसायाचे मॉडेल टिकवून ठेवण्यासाठी न्याय्य पद्धती आणि मजबूत प्रशासन मोठी भूमिका बजावेल. आरबीआयने डिजिटल कर्ज देण्यासाठी अर्थात ऑनलाइन कर्ज व्यवसायासाठी नियम आणि कायदे निश्चित केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...