आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुविधा:आता मोबाइल अॅपद्वारे काढा ATM मधून पैसे; आरबीएल बँकेने सुरू केली नवी सुविधा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सुविधेचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना आरबीएल बँकेच्या मोबँक अॅपमध्ये लॉग-इन करावे लागेल

खासगी क्षेत्रातील आरबीएल (RBL) बँकेने एटीएममधून कार्टशिवाय(कार्डलेस) पैसे काढण्यासाठी नवीन सुविधा सुरू केली आहे. आरबीएल बँकेने म्हटले की, त्यांनी इंस्टंट मनी ट्रांसफर (आयएमटी) तंत्रज्ञानाचा फायदा घेत एटीएममधून कार्डशिवाय कॅश काढण्यासी सुविधा सुरू केली आहे. म्हणजेच, आता एटीएमवर डेबिट कार्डशिवाय कॅश विड्रॉ करता येईल.

बँकेने एम पेज पेमेंट सिस्टम्ससोबत करार केला

या सुविधेसाठी बँकेने ग्लोबल फायनांस टेक्नोलॉजी प्रोवाइडर कंपनी एम पेज पेमेंट सिस्टम्ससोबत करार केला आहे. बँकेने म्हटले की, आता ग्राहक आरबीएल बँकेच्या आयएमटी सर्विसअंतर्गत 389 एटीएम आणि इतर बँकांच्या 40 हजारांपेक्षा जास्त एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढू शकतील.

या सुविदेचा फायदा कसा घ्यायचा ?

या सर्विसचा फायदा घेण्यासाठी ग्राहकाला आरबीएल बँकेच्या मोबँक अॅपमध्ये लॉग-इन करुन असे एटीएम शोधावे लागेल, ज्यात आयएमटी आहे. यानंतर या एटीएममधून रजिस्टर्ड मोबाइल नंबरचा वापर करुन किंवा अॅपद्वारे कार्डलेस विड्रॉ करता येईल.