आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कॅलेंडर वर्ष २०२० च्या अखेरच्या तीन महिन्यांत स्थावर मालमत्ता क्षेत्राची स्थिती चांगली राहिली. याचे कारण म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिकांची धारणा या तिमाहीत वर्षाच्या उच्च पातळीवर पोहोचली आहे. एवढेच नव्हे, तर पुढील सहा महिन्यांबाबत विकासकांची धारणा आणखी चांगली आहे. उद्योग संघटना फिक्की, नारेडको आणि कन्सल्टन्सी फर्म नाइट फ्रँकने जारी केलेल्या रिअल इस्टेट धारणा निर्देशांकात ही माहिती दिली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत देशाचा रिअल इस्टेट धारणा निर्देशांक ५४ अंकावर पोहोचला. जुलै-सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत यामध्ये १४ अंकांची उसळी आली आणि यासोबत निर्देशांक २०२० मध्ये प्रथमच सकारात्मक झोनमध्ये आला. पाहणीत सहभागी ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी अपेक्षा व्यक्त केली की, येत्या सहा महिन्यांदरम्यान अर्थव्यवस्थेचा वेग वाढेल. सर्वेक्षणानुसार, गेल्या कॅलेंडर वर्षाच्या चौथ्या तिमाहीत भविष्यातील धारणाही वाढून ६५ अंकावर पोहोचेल, जी तिसऱ्या तिमाहीत ५२ अंकांवर होती. देशाच्या पूर्व भागात रिअल इस्टेटच्या भविष्य धारणा निर्देशांकात सर्वात जास्त उसळी आली. हा तिसऱ्या तिमाहीत ४७ वर होता. हा चौथ्या तिमाहीत वाढून ६६ च्या पातळीवर पोहोचला.
...इकडेही चांगली बातमी : बांधकाम क्षेत्रात एफडीआय नियम सरळ होणार
कोरोनाप्रभावित अर्थव्यवस्थेत रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीला(एफडीआय) आकर्षक करण्यासाठी नियमांत शिथिलता देण्यावर विचार करत आहे. यामध्ये बांधकामापासून अॅनिमेशनपर्यंतच्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे. सूत्रांनुसार, गृह प्रकल्प, रस्ते, हॉटेल आणि रुग्णालयाच्या बांधकामात गुंतवणुकीसाठी मर्यादित लायबिलिटी पार्टनरशिपला परवानगी देणे अशा प्रस्तावांत समाविष्ट आहे. सरकारच्या अंदाजानुसार, पायाभूतशी संबंधित योजनांसाठी २०२२ पर्यंत ७७,७०० कोटी डॉलरच्या गुंतवणुकीची गरज असेल. एप्रिल २००० पासून सप्टेंबर २०२० पर्यंत बांधकाम क्षेत्रात २,५७० कोटी डॉलरची एफडीआय मिळाली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.