आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्केट रिपोर्ट:सणांच्या मूडमध्ये रिअल इस्टेट; यंदा विक्री 40 टक्के वाढण्याची शक्यता

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोविडच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम घटल्यानंतर देशाच्या रिअल इस्टेटमध्येही वेगवान सुधारणा पाहायला मिळत आहे. स्थावर मालमत्तेशी संबंधित विविध कन्सल्टन्सी संस्था आणि विकासकांच्या म्हणण्यानुसार, या सणासुदीत रिअल इस्टेट विशेषत: हाउसिंग क्षेत्रात बरीच चांगली वृद्धी पाहायला मिळेल. गणेश चतुर्थीपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ ते ४० टक्के जास्त विक्री होईल. मालमत्ता कन्सल्टंट एनारॉक ग्रुपचे चेअरमन संतोषकुमार यांच्यानुसार, देशाच्या अव्वल ७ शहरांत वार्षिक आधारावर रिअल इस्टेट लाँचिंग आणि विक्रीत ३५ ते ४०% वाढ दिसू शकते. ग्राहकधारणाही बरीच सुधारली आहे आणि मध्यम व प्रीमियम श्रेणीच्या घर खरेदीत लोकांचा रस आधीपेक्षा जास्त वाढला आहे. विकासकांनुसार, जवळपास दोन दशकांनंतर रिअल इस्टेटमध्ये एवढी वाढ पाहायला मिळत आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्था क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष जक्षय शहा यांनी दिव्य मराठी नेटवर्कला सांगितले की, रिअल इस्टेट क्षेत्रात दोन-तीन दशकांनंतर अशी सकारात्मक वृद्धी पाहायला मिळाली आहे. गणेशोत्सवापासून सुरू होणाऱ्या सणासुदीत परवडणारी घरे, मध्यम श्रेणी व व्यावसायिक श्रेणी तीन्हीतही चौकशी बरीच वाढली आहे. या सणासुदीत या क्षेत्रात वार्षिक आधारावर १५-२०% ची वाढ दिसेल. कमी, मध्यम आणि उच्च श्रेणीत सर्वात जास्त फार्म हाऊस, बंगलो आणि प्लॉटची मागणी निघत आहे. सणात गृहकर्ज देणाऱ्या वित्तीय कंपन्याही उत्साहित आहेत. एलआयसी हाउसिंग लि.चे एमडी आणि सीईओ वाय. विश्वनाथ गौड यांच्यानुसार, हाउसिंग फायनान्स कंपन्यांना या वर्षी कर्ज पोर्टफोलिओत ८-१०% ची वाढ अपेक्षित आहे.

बुकिंग-विक्रीत मध्यम-लक्झरी श्रेणीची हिस्सेदारी ७०% पर्यंत
गणेशोत्सवापासून सुरू होणाऱ्या सणाकडून काय अपेक्षा?

रिअल इस्टेट खरेदीदारांची धारणा सणांत चांगली राहण्याची अपेक्षा आहे. हाउसिंग विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत बऱ्याच चांगल्या सुधारणेची अपेक्षा आहे.

सणातील धारणेचा फायदा उचलण्यासाठी उद्योगाची तयारी?
उद्योगात सणाच्या धारणेचा लाभ घेऊन विक्री वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर डिस्काउंट आणि ऑफर्स देऊ केल्या आहेत. या वेळी खरेदीदारांना अभूतपूर्व डील मिळत आहे. याचे कारण गृहकर्जाचा कमी दर आणि विकासही स्वत:कडून जास्त सूट आणि सुविधा देत आहेत.

या वेळी कोणत्या श्रेणीत किती विक्रीची अपेक्षा आहे?
आधीच्या तुलनेत मोठे घर किंवा सदनिका खरेदीत लाेकांनी रस वाढवला आहे. सणासुदीत बुकिंग आणि विक्रीत जवळपास ७०% हिस्सेदारी मध्यम व लक्झरी श्रेणीच्या घरांची आहे. परवडणाऱ्या घरांची हिस्सेदारी ३०% आहे. लोक रेडी टू मूव्ह घर घेणे पसंत करत आहेत.
डाॅ. निरंजन हिरानंदानी, चेअरमन, नरडेको

बातम्या आणखी आहेत...