आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्यात:विक्रमी 8.6 दशलक्ष टन साखर निर्यात

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि साखरेचा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या भारतातून २०२१-२२ च्या विद्यमान विपणन वर्षात विक्रमी ८.६ दशलक्ष टन साखर निर्यात झाली असल्याचे ‘इस्मा’ या साखर उद्याेगांच्या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

२०२०- २१ विपणन वर्षात देशाने एकूण ७ दशलक्ष टन साखर निर्यात केली होती, तर त्याच कालावधीत देशांतर्गत उत्पादन ३१.१९ दशलक्ष टन होते. गेल्या महिन्यात, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सणासुदीच्या हंगामात पुरेसा देशांतर्गत पुरवठा आणि किरकोळ किमती तपासण्यासाठी सरकारने साखरेची निर्यात १० दशलक्ष टनांवर मर्यादित केली हाेती. सहकारी संस्थांनी निर्यात मर्यादा १ दशलक्ष टनांनी वाढवण्याची मागणी केली आहे.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) मते, आतापर्यंत सुमारे ९.४ ते ९.५ दशलक्ष टन निर्यात करार झाले आहेत. त्यापैकी मे २०२२ अखेरपर्यंत सुमारे ८.६ दशलक्ष टन प्रत्यक्ष निर्यात झाल्याची नोंद आहे. चालू विपणन वर्षाच्या ऑक्टोबर-एप्रिल कालावधीत देशांतर्गत बाजारपेठेत सुमारे १६ दशलक्ष टन साखरेची विक्री झाल्याचा अंदाज आहे. ही मागील वर्षीच्या १५.२६ दशलक्ष टनांच्या तुलनेत ७,५०,००० टन जास्त आहे. शिवाय, सरकारने जूनपर्यंत जाहीर केलेला देशांतर्गत साखर विक्री कोटा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ५,५०,००० टन जास्त आहे. हे लक्षात घेता, चालू विपणन वर्षात देशांतर्गत साखरेचा वापर २७.५ दशलक्ष टन असेल. तो मागील वर्षी २६.५५ दशलक्ष टन होता.

बातम्या आणखी आहेत...