आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मार्केट रिपोर्ट:ऑक्टोबर महिन्यात म्युच्युअल फंडातून विक्रमी पैसे काढले; यंदा विक्रीचा कल

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2013 नंतर भारतीय बाजारांत प्रथमच असे वातावरण तयार

म्युच्युअल फंड्सनी ऑक्टोबर महिन्यात सलग पाचव्या महिन्यात पैसे काढणे सुरू ठेवले आणि सेबीच्या डेटानुसार, या महिन्यादरम्यान त्यांनी इक्विटी बाजारातून १४,३४४ काेटी रु. काढले. ही मार्च २०१६ नंतर एका महिन्यात काढलेली सर्वाधिक रक्कम आहे. या कॅलेंडर वर्षात सध्या म्युच्युअल फंडांचा नेट इन्फ्लो २,६७१ कोटी रु. राहिला आहे. पैसे काढण्याचा हाच वेग राहिल्यास ते सात वर्षांत प्रथमच शुद्ध विक्रेता होऊ शकतात. याआधी २०१३ मध्ये म्युच्युअल फंड्सनी २१,०८२ कोटींची इक्विटी विकली होती.

बाजार नियामक सेबीच्या डेटानुसार, गेल्या पाच महिन्यांत (जून २०२०नंतर) म्युच्युअल फंड्सनी जवळपास ३७,३८८ कोटी रु. मूल्याची इक्विटी विकली आहे. एप्रिलमध्ये त्यांनी ७,९९६ कोटी रुपयांचा नेट आऊटफ्लो नोंदवला होता. मे महिन्यात त्यांनी इक्विटीमध्ये नेट ६,५२२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. म्युच्युअल फंड्सनी जानेवारीपासून मार्च २०२० दरम्यान शेअर बाजारात निव्वळ ४१,५३३ रुपयांची गुंतवणूक केली हाेती.

विश्लेषकांच्या अंदाजानुसार, या निकासीमागे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीआधीची भीती आहे. इक्विनॉमिक्स रिसर्चचे संस्थापक आणि चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर जी. चोक्कलिंगम म्हणाले, बहुतांश किरकोळ गुंतवणूकदारांनी लॉकडाऊनदरम्यान स्वत:ची गुंतवणूक करणे सुरू केले. अनिश्चित मॅक्रो-इकॉनॉमिक वातावरण आणि बाजारांच्या आर्थिक वास्तविकतेसोबत ताळमेळ न बसवण्यात गुंतवणूकदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. या कारणामुळे म्युच्युअल फंड्सनीही बाजूला राहणे पसंत केले.

म्युच्युअल फंडांत विक्रीची मोठी स्पर्धा दिसत असली तरी विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी(एफपीआय) यादरम्यान मोठी गुंतवणूक केली आहे. एनएसडीएल डेटानुसार, ऑक्टोबर २०२० दरम्यान एफपीआयने ११ महिन्यांची सर्वाधिक एका महिन्यात गुंतवणूक केली. ही २९ ऑक्टोबरपर्यंत १९,५४१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती.

लाभांश देणाऱ्या स्थिर कंपन्यांमध्ये गुंतवणूक
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी एस. नरेन यांच्या म्हणण्यानुसार, बाजारातील सुधारणा आता अधिक टिकाऊ आहे. लॉकडाऊननंतरची मागणी सुधारणा आता कायम राहिली पाहिजे. मात्र, त्यासाठी व्याजदर कमी हवे. गेल्या काही महिन्यांदरम्यान तेलाच्या किमतीत वेगवान घसरणीने आणखी एका प्रोत्साहनाचे काम केले आहे व अर्थव्यवस्था बहालीत मदत केली. निर्देशांक जवळपास कोविड-१९ आधीच्या स्थितीत पोहोचला आहे. नरेन म्हणाले, उच्च लाभांश देणाऱ्या स्थिर कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला देत आहे.