आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Recorded In Lockdown, 28 Per Cent Drop In Transactions By Card, Less Impact On App Payments

पेमेंट मोड:लाॅकडाऊनमध्ये राेकड, कार्डद्वारे 28 टक्के घटला व्यवहार, अॅप पेमेंटवर कमी परिणाम

मुंबई / विनोद यादव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना विषाणू संसर्गात आपण पैशाची देवाण-घेवाण कशी करतो ते वाचा

देशात कोरोना संसर्ग पसरल्याने पैशाच्या देवाण-घेवाणीच्या पद्धतीतही बदल झाला आहे. डिसेंबर २०१९ पासून फेब्रुवारी २०२० पर्यंत पैशांचा व्यवहार सामान्य होता. मात्र, लॉकडाऊनच्या तीन महिन्यांत(मार्च ते मे) पेमेंट मोडच्या ट्रान्झॅक्शन संख्येत घट आली आहे. कॅश, क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे व्यवहारांच्या संख्येत सुमारे २८% घट आली आहे. सर्वात कमी परिणाम मोबाइल अॅपद्वारे पेमेंट करणाऱ्यांवर झाला आहे. या माध्यमातून ट्रान्झॅक्शन संख्येत ७.६७% घट आली आहे. चांगली बाब म्हणजे, गावांत व्यवहारावर कमी परिणाम झाला. बहुतांश गावांत फीचर फोनवर चालणारे*99# यूएसएसडी आधारित पेमेंट ट्रान्झॅक्शनमध्ये जवळपास ८ टक्क्यांची घट आली आहे.

पे-निअरबाय तंत्रज्ञानाचे संस्थापक आनंदकुमार बजाज नावाचे बँकिंग क्षेत्रात ५ पेमेंट आहे. ते म्हणाले, लॉकडाऊनदरम्यान कॅश विड्रॉलपासून डिजिटल ट्रान्झॅक्शनपर्यंतच्या कमतरतेचे कारण उत्पन्नात घट आणि लोक बचतीकडे वळणे हे आहे. हॉटेल-रेस्तराँ आणि मॉल बंद आहेत. लोक आता अनावश्यक खर्च टाळत आहेत. या कारणामुळे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारे व्यवहारात घट आली आहे. पेटीएमच्या म्हणण्यानुसार, महाराेगराईच्या उद्रेकामुळे भारतात लोक कोरोना विषाणू संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी डिजिटल रूपात देवाण-घेवाण करणे पसंत करत आहेत. एप्रिलपासून जूनच्या अवधीत पेटीएमने देवाण-घेवाणीत ३५% ची वृद्धी पाहिली. आम्ही वीज बिल, डीटीएच, मोबाइल रिचार्जसारख्या युटिलिटी पेमेंटमध्ये ५० टक्के ऑनलाइन मर्चंट पेमेंटमध्ये ३५% आणि ऑफ लाइन मर्चंट पेमेंटमध्ये १२२ टक्के वृद्धी नोंदवली आहे. याशिवाय झीटीव्ही ग्रोथ आणि पी-टू-पी पेमेंटमध्येही ५० टक्क्यांची वाढ झाली आहे.

आहे. हॉटेल-रेस्तराँ आणि मॉल बंद आहेत. लोक आता अनावश्यक खर्च टाळत आहेत. या कारणामुळे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारे व्यवहारात घट आली आहे. पेटीएमच्या म्हणण्यानुसार, महाराेगराईच्या उद्रेकामुळे भारतात लोक कोरोना विषाणू संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी डिजिटल रूपात देवाण-घेवाण करणे पसंत करत आहेत. एप्रिलपासून जूनच्या अवधीत पेटीएमने देवाण-घेवाणीत ३५% ची वृद्धी पाहिली. आम्ही वीज बिल, डीटीएच, मोबाइल रिचार्जसारख्या युटिलिटी पेमेंटमध्ये ५० टक्के ऑनलाइन मर्चंट पेमेंटमध्ये ३५% आणि ऑफ लाइन मर्चंट पेमेंटमध्ये १२२ टक्के वृद्धी नोंदवली आहे. याशिवाय झीटीव्ही ग्रोथ आणि पी-टू-पी पेमेंटमध्येही ५० टक्क्यांची वाढ झाली आहे.

0