आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठे यश:नोकरभरतीला ग्रीन पॉवर, अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात 2025 पर्यंत 15 लाख नोकऱ्या

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्लोबल ग्रीन एनर्जी सेक्टरच्या नव्या नोकऱ्यांत 20% एकट्या भारतात

ग्रीन एनर्जी अर्थात अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत आहे. सार्वजनिक आणि खासगी गुंतवणूक सतत वाढत आहे. यामुळे देशात रोजगार वृद्धीत या क्षेत्राची मोठी भूमिका राहिली आहे. इंटरनॅशनल रिन्ह्यूवेबल एनर्जी संस्थेनुसार, २०२५ पर्यंत भारताचे ग्रीन एनर्जी क्षेत्र जवळपास १५ लाख नव्या नोकऱ्या निर्माण करेल. संस्थेनुसार, २०३० पर्यंत या क्षेत्रात ३० लाख नवे जॉब निर्माण होऊ शकतात. स्थापित अक्षय्य ऊर्जा प्रकरणांत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

नॅशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन आणि कौन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायर्नमेंट अँड वॉटरच्या अहवालानुसार, भारतात २०१४ पासून २०१९ दरम्यान अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात नोकऱ्या पाचपट वाढल्या आहेत. आगामी वर्षांत हा वेग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, २०२२ पर्यंत देशात अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात ३ लाख नव्या नोकऱ्या निर्माण होतील. भारतात सध्या एकूण ऊर्जा उत्पादनात सौर आणि पवनऊर्जेची हिस्सेदारी जवळपास १०-१० टक्के आहे. सौरऊर्जा निर्मिती डिसेंबर २० तिमाहीच्या तुलनेत २०२१ च्या पहिल्या तिमाहीत २३ टक्के वाढली आहे. वार्षिक आधारावर यामध्ये १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतात सध्या उत्पादित विजेत ३८% हिस्सा बिगरजीवाश्म इंधनातून तयार होणाऱ्या विजेचा आहे. २०३० पर्यंत ही हिस्सेदारी ६० ते ६५ टक्क्यांवर येऊ शकते. या प्रमाणात नोकऱ्याही वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रोजगार वृद्धी दर १२ टक्के
मोठे जलविद्युत प्रकल्प वगळल्यास गेल्या काही वर्षांत ग्रीन एनर्जी क्षेत्रात रोजगार वृद्धिदर १२ टक्क्यांहून जास्त नोंदला आहे. जगभरात ग्रीन एनर्जी क्षेत्रात जोडलेल्या नव्या नोकऱ्यांपैकी जवळपास २० टक्के भारतात निर्माण होत आहेत. भारत सरकारच्या अक्षय्य ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, पुढील वर्षापर्यंत भारताचे उद्दिष्ट १७५ गिगावॅट अक्षय्य ऊर्जा उत्पादन आहे. हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राची गुंतवणूक होत आहे आणि यामुळे नोकऱ्यांची संख्या वाढत आहे. वाढती वीज गरज भागवण्यासाठी अक्षय्य ऊर्जा पर्याय म्हणून पुढे येत आहे.

ग्रीन एनर्जी क्षेत्रात नोकऱ्यांची शक्यता

अक्षय्य ऊर्जा, वेस्ट मॅनेजमेंट, ग्रीन ट्रान्सपोर्ट आणि अर्बन फार्मिंगसारख्या क्षेत्रांत सतत नव्या नोकऱ्या वाढत आहेत. अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात २०३० पर्यंत ३० लाख नव्या नोकऱ्या जोडल्या जाऊ शकतात. - इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन सेटलमेंट

२०२२ पर्यंत भारतात अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात ३ लाख नव्या नोकऱ्या निर्माण होतील. -इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन

भारतात २०१४ ते २०१९ दरम्यान अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात नोकऱ्या पाचपट होण्याची शक्यता आहे. हा वेग आणखी वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. -नॅशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन आणि कौन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर

रिन्यूव्हेबल एनर्जी संस्थेच्या अहवालानुसार, जगभरात अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात २०३० पर्यंत २ काेटींपेक्षा जास्त नव्या नोकऱ्या तयार होण्याची आशा आहे. २०२३ पर्यंत एनर्जी ट्रान्झिशनशी संबंधित तंत्रज्ञानात जवळपास ५५ लाख जॉबपर्यंत जगभरात जोडले जाऊ शकतात. या नोकऱ्यांत विंड फार्मचा हिस्सा ऑफशोअर पवनक्षमतेतील वाढीमुळे २०२५ पर्यंत वाढून १२ टक्के होऊ शकतो. ऑपरेशन आणि मेंटेनन्सच्या क्षेत्रात सर्वात जास्त नोकऱ्या वाढतील.

बातम्या आणखी आहेत...