आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरव्ह्यू:मार्चपर्यंत अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांत सुधारणा, नंतर वृद्धी रुळावर : खारा

नवी दिल्ली | धर्मेंद्रसिंह भदौरिया7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाची सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन दिनेशकुमार खारा बँकेला तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आणखी सक्षम बनवणार आहेत. कर्जाच्या दरात आणखी कपातीची शक्यता नाही, असे खारा म्हणाले. खारा यांच्याशी केलेल्या चर्चेतील काही अंश...

देशाची अर्थव्यवस्था कधीपर्यंत सामान्य होईल?
जसजशी अर्थव्यवस्था अनलॉक झाली तशी मागणी दिसली आहे. कोरोना लसीबाबत निश्चितता येत आहे. आगामी दोन महिन्यांत सकारात्मक वृद्धीचा अंदाजही रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. हे सर्व पाहता वित्त वर्षअखेरीस अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांत सकारात्मक सुधारणा पाहायला मिळेल,असे वाटत आहे. आगामी वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीपासून आम्ही वृद्धीच्या रुळावर आलेले असू.

रिटेल, एसएमई आणि कंपनी कर्जाच्या स्थितीत किती बदल पाहायला मिळाला?
आमच्या संपूर्ण कर्जाची वाढ ७% आहे. गृह कर्जाबाबत बोलायचे झाल्यास, मंजुरीची वृद्धी आणि कर्ज वाटण्याची वाढ १२ टक्के आहे. एसएमई वाढ दुसऱ्या तिमाहीनंतर पाहायला मिळेल. कंपनी कर्ज प्रकरणे जी येत आहेत, त्यांची पूर्ण पडताळणी केल्यानंतरच देत आहोत.

आरबीआयच्या निर्देशांनंतर किती कर्ज पुनर्गठन करण्याची योजना आहे ?
आम्ही पुनर्गठन होणाऱ्या कर्जाची ओळख पटवली आहे आणि कृती आराखडा तयार केला आहे. हा पुनर्गठनासाठी अशीर्षकांकित असतील. यापैकी ५०% डिसेंबर अखेरपर्यंत पुनर्गठित होतील. कंपनीत ७ हजार कोटी रुपयांचे पुनर्गठन होईल. आम्ही जी खाती निश्चित केली आहेत, त्यांचे पुनर्गठन करण्याचा प्रयत्न आहे.

कोरोनात लोकांच्या बँकिंगमध्ये बदल आला आहे, ऑनलाइन व्यवहार किती वाढले आहेत?
कोरोनादरम्यान ऑनलाइन बँकिंगशी संबंधित मोठ्या संख्येत नवीन ग्राहक जोडले आहेत. योनोद्वारे होणाऱ्या डिजिटल बँकिंगमध्ये २०० टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे. ४० लाख नवे युजर्स इंटरनेट बँकिंगमध्ये आले आहेत. आता योनोचा ग्राहक बेस ६.२ कोटी ग्राहकांपेक्षा जास्त झाला आहे. बँकेच्या एकूण व्यवहारात या वित्त वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत डिजिटल व्यवहाराची हिस्सेदारी ६७ टक्के झाली आहे, ही आधी ५०% होती.

भविष्यात तंत्रज्ञानाच्या बाबतीत बँक कोणते पाऊल उचलत आहे?
आमचा प्रयत्न नवी उत्पादने डिजिटलच्या माध्यमातून उपलब्ध केली जावेत. उदा. आम्ही दुसऱ्या तिमाहीत ५ हजार कोटी रुपयांचे कर्ज योनोद्वारे मंजूर केले आहे. ३०% वैयक्तिक कर्ज डिजिटल माध्यमातून उपलब्ध केले आहे. आम्ही दररोज २० हजार बचत खाती योनोच्या माध्यमातून उघडत आहोत.

बँक किती नवे रोजगार देत आहे आणि विस्ताराची तयारी काय आहे?
सहयोगी स्तरावर आठ हजार लोकांची भरती करतो आणि अधिकारी स्तरावर दोन हजार जणांची भरती दरवर्षी करतो. त्याचप्रमाणे ५-६ हजार अॅप्रेंटिस स्तरावर भरती करू आणि विशेष अधिकारीही नियुक्त करतो. यासोबत काही इतर भरतीही करतो. भरती प्रक्रिया चालू आहे. वर्षअखेरीस याचे पूर्ण काम करू. आम्हाला ४५०-५०० नवीन शाखा उघडायच्या होत्या. यापैकी सुमारे ३५० शाखा उघडल्या आहेत. उर्वरित शाखा मार्च २०२१ च्या अखेरपर्यंत उघडल्या जातील.

योनोबाबत योजना काय, एसबीआय कार्डच्या धर्तीवर हे शेअर बाजारात लिस्ट कराल?
योनो आणखी बळकट होईल. तांत्रिक अडचणी दूर करत आहोत. योनोच्या लिस्टिंगचा सध्या विचार नाही. भविष्यात याच्या स्वतंत्र लिस्टिंगचा विचार होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...