आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेहराडून:अधिकृत वेबसाइटवरून चारधामची नोंदणी करा

डेहराडूनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फसवी नोंदणी टाळण्यासाठी यात्रेकरूंनी चारधाम यात्रेसाठी अधिकृत वेबसाइटवरच नोंदणी करावी. चारधाम यात्रेसाठी ऑक्टोबरपर्यंत अजून वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत यात्रेकरूंनी प्रवासात अडचण होऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारची घाई करू नये, असे उत्तराखंडचे पर्यटन सचिव दिलीप जवळकर यांनी सांगितले. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, प्रवाशांनी कोणत्याही बेकायदेशीर स्रोताद्वारे नाेंदणी करू नये तसेच हेलि तिकीट बुकिंग अधिकृत वेबसाइट अथवा काउंटरवर आपली नाेंदणी करून तिकीट बुक करावे. त्यांनी सांगितले की, काही लोक फोटोशॉपिंग करून किंवा पीडीएफचे फोटोशॉपिंग करून त्यावरील चित्र आणि इतर माहिती बदलून प्रशासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु क्यूआर कोड स्कॅन करताच असे लोक उघडकीस येतात. अशा प्रवाशांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात येतो. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांनी अधिकृत वेबसाइट किंवा काउंटरवरूनच नोंदणी करून घ्यावीही. संपूर्ण मोफत सेवा आहे.

बातम्या आणखी आहेत...