आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Reinsurance Is Expensive; Health, Term Insurance Premiums Will Also Become More Expensive

झटका:पुनर्विमा महागला; आरोग्य, मुदत विमा हप्ताही महागणार, कोरोनातील नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्या सज्ज

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेविड-१९ महामारीमध्ये झालेल्या माेठ्या नुकसानीनंतर पुनर्वित्त कंपन्यांनी हमी देण्याचे निकष कडक केले आहेत. त्याचा परिणाम मुदत विमा आणि आरोग्य विम्याच्या हप्त्यावर हाेणार आहे.देशातील सर्वात मोठी पुनर्विमा कंपनी ‘जीआयसी रे’ने या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आपले दर वाढवले हाेते, तर दुसरी कंपनी म्युनिच रे यांनी अलीकडेच हमीविषयक निकष कडक केले आहेत.

एका माेठ्या सर्वसाधारण विमा कंपनीच्या अधिकारी दैनिक भास्करशी बाेलताना म्हणाले की, बहुतांश विमा कंपन्यांनी हप्ता वाढवण्यास सुरुवात केली आहे. अनेक कंपन्यांनी हप्ता वाढवला असून काही कंपन्यांनी हप्ता वाढवण्यासाठी विमा नियामक इर्डाकडे अर्ज केला आहे. हप्ता वाढवण्यात येत असलेल्या पाॅलिसींमध्ये मुदत विमा, आराेग्य विमा आणि काेराेना कवच व काेराेना रक्षक यांचा समावेश आहे.

अन्य एका विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले, जीआयसी रे ही देशातील सर्वात माेठी पुनर्विमा कंपनी आमची पुनर्विमा कंपनी आहे. कंपनीने मार्चमध्ये दर वाढवले असून त्याची अंमलबजावणी एप्रिलपासून झाली आहे. परंतु या दरवाढीचा सध्या तरी ग्राहकांवर भार टाकण्यात आलेला नाही. परंतु आता आम्हाला मुदत विम्याचा दर वाढवण्याची गरज वाटत आहे. या वर्षात आम्ही हप्त्याच्या दरात १५-२०%पर्यंत वाढ करणार आहाेत.

वाढीव दावा भरपाईसाठी कंपन्यांनी केली तरतूदकेअर रेटिंगनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जीवन विमा क्षेत्रात एप्रिल-जून तिमाहीत दाव्यांचे प्रमाण माेठ्या प्रमाणावर हाेते.त्याच वेळी, कंपन्यांच्या नफ्यावरही परिणाम झाला. कारण विमा कंपन्यांनी वाढीव दावे भरण्यासाठी तरतूदही केली होती. २०२१-२२मध्ये जीवन विमा हप्त्यामध्ये महत्त्वपूर्ण अस्थिरता दिसू शकते. तथापि, आर्थिक सुधारणांना अपेक्षेप्रमाणे गती मिळाली नाही आणि कोरोना महामारी अजून संपलेली नाही. ही हप्ता वाढ आणि मुदत याेजनांच्या हप्त्यांच्या दरवाढीचा नकारात्मक परिणाम हाेऊ शकताे.

काही विमा कंपन्यांचा थांबा आणि वाट पाहा पावित्रा
दरम्यान, काही जीवन विमा कंपन्या अजूनही थांबा आणि वाट पाहा अशा स्थितीत आहेत. सहा महिने ते एका वर्षात साथीचे आजार नियंत्रणात आल्यास पुन्हा विमा कंपन्यांचे दर खाली येतील अशी त्यांची अपेक्षा आहे. कोविडने लोकांमध्ये जीवन विमा उत्पादने, विशेषत: मुदत जीवन उत्पादनांनी लाेकांमध्ये जागृती निर्माण केली आहे, त्यामुळेही मागणी ाढली आहे. विमा कंपन्यांनी मोठ्या संख्येने दावे भरपाई केली आहे. विशेषत: दुसऱ्या लाटेनंतर. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील दाव्यांची संख्या २ ते ३ पट जास्त होती.

बातम्या आणखी आहेत...