आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Reliance 34th In World's Top 500 Companies, Apple Top, 20 Indian Companies Included

जगातील टॉप 500 कंपन्यांत रिलायन्स 34 वी:अ‍ॅपल टॉप, 20 भारतीय कंपन्यांचा समावेश

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील ५०० सर्वाधिक मूल्यवान कंपन्यांच्या यादीत २० भारतीय कंपन्यांना स्थान मिळाले. यात १६.५४ लाख कोटी रुपये मूल्यासह रिलायन्स इंडस्ट्रीज आघाडीवर आहे. याला जगभरातील ३४ वी सर्वात मूल्यवान कंपनी मानले गेले आहे. यात अदानी ग्रुपच्या अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटल गॅस या चार कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी हुरुन ग्लोबल ५०० यादीत ८ भारतीय कंपन्यांचा समावेश होता. शुक्रवारी जारी यादीनुसार, आयफोन बनवणारी अ‍ॅपल जगातील सर्वात मूल्यवान कंपनी आहे. त्याचे मूल्य १९७.७४ लाख कोटी रुपये आहे. १४८.३१ कोटी रुपये मूल्यासह मायक्रोसॉफ्ट दुसरी सर्वात मूल्यवान कंपनी आहे. हुरुन इन्स्टिट्यूटनुसार, गेल्यावर्षी जगातील टॉप-५०० कंपन्यांच्या मूल्यात ९१४.५५ लाख कोटींची घसरण झाली आहे.

आघाडीच्या कंपन्या मूल्य अ‍ॅपल १९७.74 मायक्रोसॉफ्ट 148.31 रिलायन्स 16.64 टीसीएस 11.45 अदानी इंटरप्राइज 5.19 (मूल्य लाख-कोटी रुपयांत)

बातम्या आणखी आहेत...