आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Reliance Became The First Company In The Country With A Market Capitalization Of Rs 11 Lakh Crore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिलायन्स:11 लाख कोटी बाजार भांडवलाची देशाची पहिली कंपनी झाली रिलायन्स, 10 लाख कोटी व 9 लाख कोटींचा आकडाही रिलायन्सने स्पर्श केला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नीचांकी स्तरापेक्षा दुप्पट वाढले समभाग

रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी कंपनीच्या पूर्ण कर्जमुक्तीची घोषणा केली. या घोषणेनंतर शुक्रवारी बीएसईमध्ये आरआयएलच्या समभागांनी ६.२३% वाढ प्राप्त केली. सेन्सेक्समध्ये रिलायन्सचे शेअर आतापर्यंतची उच्च पातळी १७५९.५० रुपयांवर पोहोचले. यासोबत कंपनीचे बाजार भांडवल ११.१५ लाख कोटी रुपयांवर पाेहोचले. हा आकडा स्पर्श करणारी रिलायन्स देशातील पहिली कंपनी झाली आहे. आधीही १० लाख कोटी आणि ९ लाख कोटींच्या बाजार भांडवलाचा आकडा रिलायन्सने स्पर्श केला होता. शुक्रवारी मुकेश अंबानींनी केवळ ५८ दिवसांत १.६८ लाख कोटी रु. जमा करून रिलायन्सला कर्जमुक्त करण्याची घोषणा केली. गुंतवणूकदार रिलायन्सच्या भवितव्याबाबत खूप सकारात्मक आहेत. एंजेल ब्रोकिंगचे डीव्हीपी ज्योती राय यांच्यानुसार, कंपनीने रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स, दूरसंचार आणि रिटेल व्यवसायात अस्तित्व नोंदवले आहे. आमचा विश्वास आहे की, पुढे चालून हा डिजिटल आणि रिटेल व्यवसाय, रिलायन्सच्या वृद्धीत प्रमुख भूमिका निभावेल.

रिलायन्ससाठी जिओ प्लॅटफॉर्म्स गेमचेंजर

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीसाठी तिची सहायक कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्स गेमचेंजर ठरली आहे. रिलायन्सवर ३१ मार्च २०२० पर्यंत १,६१,०३५ कोटी रुपयांचे निव्वळ कर्ज होते. मात्र, जिओने फेसबुक, सिल्व्हर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अॅटलांटिक, केकेआर, मुबाडला, एडीआयए, टीपीजी, एल कॅटेरटनआदी गुंतवणूकदारांकडून २२ एप्रिल २०२० पासून आतापर्यंत १,१५,६९३.९५ कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे.

नीचांकी स्तरापेक्षा दुप्पट वाढले समभाग

रिलायन्स मात्र एकापाठोपाठ एक धमाके करत आहे. रिलायन्सच्या समभागांत नीचांकी स्तरातून ९५% ची तेजी आली आहे. शुक्रवारी रिलायन्सची शेअर प्राइस आपल्या नीचांकी पातळीच्या १७५९ रुपयांवर पोहोचली. रिलायन्सने एका वर्षाचा नीचांकी स्तर ८६७.८२ रुपयांना स्पर्श केला होता. ३ महिन्यांच्या आत शेअरचा भाव जवळपास दुप्पट झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...