आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगभरातील अर्थव्यवस्था आणि कंपन्या कोरोनाने ग्रासलेल्या असतानाच रिलायंस एक अपवाद ठरली आहे. रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडने जवळपास 1.69 लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. या गुंतवणुकीच्या माध्यमातून आता रिलायंस समूह आपल्या ठरवलेल्या वेळेपूर्वीच कर्जमुक्त झाले आहे. रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी आपल्या कंपनीच्या गुंतवणूकदारांना ही माहिती दिली. तसेच वेळेपूर्वीच आपण लक्ष्य साध्य केले असे सांगितले आहे.
58 दिवसांत गोळा केले 1.69 लाख कोटी
रिलायंस इंडस्ट्रीजने 58 दिवसांत 1 लाख 68 हजार 818 कोटी रुपये गोळा केला आहेत. यात जिओ प्लॅटफॉर्मची भागिदारी विक्री, आणि राइट्स इश्यूच्या माध्यमातून जमवलेले पैसे आहेत. जिओमध्ये जागतिक गुंतवणूकदारांनी 1,15,693.95 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. तर राइट्सच्या माधध्यमातून 53,124.20 कोटी रुपये मिळाले आहेत. आरआयएलने सांगितल्याप्रमाणे, पेट्रोल-रिटेल संदर्भात बीपी सोबत संयुक्त करार अंमलात आल्यास एकूण गुंतवणूक वाढून 1.75 लाख कोटी रुपये होईल. 31 मार्च 2020 पर्यंत रिलायंसवर 1.61 लाख कोटींचे कर्ज होते. मात्र, काही दिवसांतच झालेल्या या गुंतवणुकीमुळे कंपनी कर्जमुक्त झाली आहे.
जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये या कंपन्यांनी केली गुंतवणूक
कंपनी | गुंतवणुकीची तारीख | गुंतवणूक (कोटींमध्ये) | भागिदारी |
फेसबुक | 22 एप्रिल | 43,573.72 | 9.99% |
सिल्व्हर लेक पार्टनर्स | 4 मे | 5,655.75 | 1.15% |
व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स | 8 मे | 11,367 | 2.32% |
जनरल अटलांटिक | 17 मे | 6,598.38 | 1.34% |
केकेआर | 22 मे | 11,367 | 2.32% |
मुबाडला | 5 जून | 9093.60 | 1.85% |
सिल्व्हर लेक अन्य निवेश | 5 जून | 4546.80 | 0.93% |
आबूधाबी इंव्हेस्टमेंट अथॉरिटी | 7 जून | 5683.50 | 1.16% |
टीपीजी | 13 जून | 4546.80 | 0.93% |
एल केटरटन | 13 जून | 1894.50 | 0.39% |
पीआयएफ | 18 जून | 11,367 | 2.32% |
एकूण | 1,15,693.95 | 24.70% |
राइट्स इश्यू | 20 मे ते 3 जून | 53,124.20 |
एकूण गुंतवणूक | 168,818.15 |
नोट: गुंतवणुकीची रक्कम कोटी रुपयांत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.