आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:रिलायन्सने टाटा समूहाला टाकले मागे, यात अजून जिओच्या ४.४० लाख कोटी रुपये मूल्याचा समावेश नाही

स्कंद विवेक धर | भोपाळ, मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टाटा समूहाचे एकूण बाजारमूल्य 11.32 लाख कोटी, रिलायन्स 13 लाख कोटींच्या पुढे

रिलायन्स उद्योगाच्या शेअर्समध्ये गेल्या अडीच महिन्यांत आलेल्या उसळीमुळे कंपनी आणि तिचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या यशात भर पडली आहे. या उसळीमुळे रिलायन्स १३ लाख कोटी रुपयांचे मूल्य असलेली कंपनी झाली, तर अंबानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत झाले. तसेच रिलायन्सने आणखी एक ऐतिहासिक यश मिळवले. बाजारभावाच्या हिशेबाने रिलायन्स आता टाटा समूहाला मागे टाकून देशातील सर्वात मोठा उद्योग समूह झाला आहे.

टाटा समूहाच्या एकूण १७ कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. गेल्या वर्षी १ एप्रिलला रिलायन्सचे बाजारमूल्य ८९१००० कोटी रु. होते, तर टाटाच्या १७ कंपन्यांचे बाजारमूल्य ११०९८०९ कोटी रु. होते. म्हणजे रिलायन्सपेक्षा सुमारे २.१८ लाख कोटी जास्त. मात्र, नुकतेच रिलायन्समध्ये झालेल्या वाढीने चित्र बदलले आहे. ब्रोकरेज फर्म झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामथ सांगतात, टाटाची टीसीएस शिवाय कोणतीच कंपनी चांगली कामगिरी करत नाहीये. टाटा मोटर्स व स्टीलने वाईट कामगिरी केली. याचे कारण त्यांचे क्षेत्र दबावात असणे. व्यवस्थापनात झालेल्या बदलाचाही परिणाम झाला. यामुळे टाटाचे मूल्य अपेक्षेप्रमाणे वाढले नाही. बाजारतज्ञ अंबरीश बलिगा यांनी सांगितले, बाजारात चांगल्या गोष्टी विकल्या जातात. रिलायन्सबाबत सर्व गोष्टी सुरू आहेत, तर टाटांच्या बाबतीत विशेष चांगले ऐकण्यात आले नाही.

तज्ञ म्हणाले, टाटा- रिलायन्समध्ये आता अंतर वाढतच राहील

टाटाला मागे टाकण्यात रिलायन्सला ४७ वर्षे लागली असली तरी तज्ञांना वाटते की,हे अंतर वाढत राहिल. रिलायन्स जिओचे मूल्य आता ४.४० लाख कोटीच्या जवळपास आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर त्याचे मूल्य वाढेल. यामुळे समूहाचे बाजारमूल्यही वाढेल. कामथनुसार रिलायन्स डिजिटल क्षेत्रात येत आहे, भविष्यात चांगली कामगिरीची अपेक्षा आहे. तर टाटा परंपरागत क्षेत्रात आहे. अशात रिलायन्स व टाटा समूहात अंतर वाढत राहिल. बलिगा यांनाही हेच वाटते. त्यांनी सांगितले की, रिलायन्स आता टाटाच्या पुढेच राहिल. अट ही की, कंपनीने तयार केलेल्या योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी.