आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Reliance Is Investing Money In Debt Funds By Selling Its Stake In The Jio Platform; Competition Among Asset Management Companies For Share Purchase Continues

गुंतवणूक:जिओ प्लॅटफाॅर्ममधील भांडवली हिस्सा विकून रिलायन्स डेट फंडात गुंतवत आहे पैसा; हिस्सा खरेदीसाठी अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू

शुभदीप सिरकर, दिव्या पाटील आणि सैकत सुंदरिया |दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिलायन्सची आतापर्यंत डेट म्युच्युअल फंडात 35 हजार काेटींची गुंतवणूक

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने जिआे प्लॅटफाॅर्ममधील भांडवली हिस्सा विक्री, हक्कभाग विक्री आणि बीपीबराेबर संयुक्त सहकार्य या माध्यमातून एकूण २,१२,८०९ काेटी रुपयांच्या निधीची उभारणी केली आहे. आता ही रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली जात आहे. या बातमीनंतर रिलायन्सच्या गुंतवणुकीतील हिस्सा खरेदी करण्यासाठी अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. या घडामाेडींशी निगडित असलेल्या फंड व्यवस्थापकांच्या मते रिलायन्सने कमीत कमी ४७० काेटी डाॅलरची (अंदाजे ३५.२५० काेटी रु.) गुंतवणूक डेट फंडात केली आहे. कंपनीने ही रक्कम अत्यल्प आणि मनी मार्केट फंडात आणि सरासरी तीन ते पाच वर्षांची मॅच्युरिटी असलेल्या डेड फाेकस फंडात गुंतवली आहे. हा देशातील आर्थिक बाजारासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. भविष्यात रिलायन्स या पैशाचा वापर कसा करेल यावर सर्व चलन व्यवस्थापक अंदाज व्यक्त करतानाच हिस्सेदारी खरेदीच्याही विचारात आहेत. रिलायन्सने डेट फंडात दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली आहे.

गुंतवणुकीचा वेग वाढल्याने राेख्यांत तेजी

डेट फंड गुंतवणुकीचा वेग वाढल्याने अल्प कालावधीच्या राेख्यांत तेजीचा कल दिसला. रिझर्व्ह बँक येणाऱ्या काळात आणखी दरकपात करू शकते या अपेक्षेतून बँका व गुंतवणूकदार डेट फंडात गुंतवणूक करत आहेत. २०५५ बाँडचा ५.२२ % यील्ड जुलैत १९ बेसिस अंकांनी घसरला आहे.

गेल्या महिनाभरात रुपया १.५ टक्के मजबूत

विदेशी चलन व्यापाऱ्यांच्या मते रिलायन्सने जिआे प्लॅटफाॅर्ममधील हिस्सा विक्री केल्यानंतर देशात आलेल्या पैशामुळे रुपया गेल्या महिनाभरात ११४ पैशांनी (१.५%) मजबूत झाला आहे. त्याचबराेेबर रुपया आशियातील सर्वाेत्तम कामगिरी करणारे चलन ठरले आहे.