आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • As The Study Project Was Stopped, Isha Said Dad, The Internet Has No Speed; That's When Mukesh Ambani Came Up With The Idea Of Jio

उत्तम रणनीतीची जिओची 6 वर्षे:प्रोजेक्ट रखडल्याने ईशा म्हणाल्या- बाबा इंटरनेटला स्पीडच नाही; तेव्हा मुकेश अंबानींना जिओची कल्पना सुचली

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साल 2011 होते भारत संथ इंटरनेटच्या समस्येला झुंज देत होता. त्याबरोबरच डेटा इतका महागडा होता की, साधा 1GB, 2G डेटाची किंमत महिन्याला सुमारे 100 रुपये होती. म्हणजेच प्रत्येकाला इंटरनेट वापरणे शक्य नव्हते. युट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओ आजच्या तुलनेत खूपच कमी लोक पाहत असत. त्यावेळी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी या अमेरिकेतील येल विद्यापीठात शिक्षण घेत होती.

त्यांना महाविद्यालयातील स्टडी प्रोजेक्ट सादर करायचे होते. परंतू इंटरनेटचा वेग कमी असल्याने ते कठीण होत होते. तेव्हा इशा त्यांच्या वडिलांना म्हणजे मुकेश अंबानी यांना म्हणाल्या की, पप्पा, आपल्या घरात इंटरनेट चालत नाही. त्याचा स्पीड खूप कमी आहे. तसेच ईशा यांचा जुळा भाऊ आकाश अंबानींने देखील वडिलांना सांगितले की, पूर्वी, टेलिकॉम म्हणजे फक्त लोकांसाठी व्हॉइस कॉलिंग होती. परंतू आता सर्व काही डिजिटल झालेले आहे. आणि येथूनच खऱ्या अर्थाने जिओची कल्पना जन्माला आली आणि 5 सप्टेंबर 2016 मध्ये जिओ लॉंच करण्यात आले.

आज 5 सप्टेंबर 2022 रोजी जिओ लॉंच होऊन सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. या 6 वर्षात जिओ भारतातील सर्वात मोठा गेम चेंजर बनला आहे. भारतात परवडणाऱ्या किमतीत मोफत व्हॉईस कॉलिंग आणि जगातील सर्वात कमी किमतीत उच्च दर्जाचा डेटा देणारा जिओ पहिली कंपनी ठरली आहे. यातून भारताच्या दूरसंचार क्षेत्राचे चित्र बदलले आहे. लाँच झाल्यापासून अवघ्या 170 दिवसांत जिओने 100 दशलक्ष ग्राहकांची संख्या ओलांडली होती. हे सध्या देशातील पहिल्या क्रमांकाचे नेटवर्क समजले जाते.
जिओ लोगोमध्ये काय अर्थ दडला
Jio चे पूर्ण नाव 'Joint Implementation Opportunities' आहे. कंपनीचे पूर्ण नाव Reliance Jio Infocomm Limited आहे. रिलायन्स जिओचे घोषवाक्य 'डिजिटल लाइफ' आहे. त्याची लोकप्रिय टॅगलाईन 'जिओ जी भरके' आहे. ईशाने जर्मन डिझायनरच्या सहकार्याने जिओचा लोगो डिझाइन केला आहे. जिओच्या लोगोमध्येही एक अर्थ दडलेला आहे. जेव्हा तुम्ही जिओ फ्लिप करता तेव्हा ते Oil बनते, ज्यावर रिलायन्स कंपनी आधारित आहे.

तुम्ही Jio लोगो फ्लिप केल्यास ते oiL बनते.
तुम्ही Jio लोगो फ्लिप केल्यास ते oiL बनते.

जिओच्या रणनीतीला यश मिळाले
जिओ लॉंच करताना टेलिकॉम मार्केटमध्ये एअरटेलचे वर्चस्व होते. व्होडाफोन, आयडिया आणि बीएसएनएलसह 8 कंपन्या होत्या. त्यापैकी आता चार कंपन्या बाकी आहेत. वापरकर्त्यांना 1 मिनिट कॉलसाठी सरासरी 58 पैसे मोजावे लागले. डेटाचा वापरही खूप महाग होता. जिओला ही समस्या समजली आणि सुरुवातीला सर्वांना मार्केट काबीज करण्यासाठी मोफत सीम देण्यात आले. यामध्ये दररोज 4GB डेटा तीन महिन्यांसाठी मोफत दिला जात होता. मोफत अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 संदेश देखील प्रदान केले जातात.

2017 मध्ये, जेव्हा देशात पुरेसे 4G हँडसेट नव्हते. तेव्हा Jio ने 4G सह फीचर फोन लॉंच केला होता. वापरकर्ता आधार तयार केल्यानंतर, अतिशय स्वस्त पॅक लॉंच केले गेले. या धोरणामुळे इतर दूरसंचार ऑपरेटर्सनाही त्यांचे व्यवसाय मॉडेल बदलण्यास भाग पाडले. 4G नेटवर्क नसल्यामुळे बीएसएनएल शर्यतीतून बाहेर पडली होती. व्होडाफोन-आयडिया विलीनीकरणानंतरही कोणीही चमत्कार कामगिरी करू शकले नाही. त्यांच्या वापरकर्त्यांमध्ये सतत घट होत गेली आणि आजही होत आहे.

413 कोटी ग्राहकांसह नंबर वन ऑपरेटर बनला
एअरटेल सध्या जिओच्या तुलनेत आघाडीवर आहे. 363 दशलक्ष वापरकर्त्यांसह एअरटेल देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. 41.30 दशलक्ष मोबाईल आणि सुमारे 7 दशलक्ष जिओ फायबर ग्राहकांसह जिओचा भारतातील 36 टक्के बाजार हिस्सा आहे. महसुलाच्या बाबतीत त्याचा वाटा 40.3 टक्के आहे. मुकेशस अंबानी यांनी दिवाळीपर्यंत 5G लॉंच करण्याची घोषणा केली आहे. 5G लाँच झाल्यानंतर, डेटा वापरामध्ये मोठी उडी असू शकते.
डेटा वापर शंभर पटीने वाढला
सहा वर्षांमध्ये दूरसंचार उद्योगात दर महिन्याला सरासरी दरडोई डेटा वापरामध्ये 100 पटीने वाढ झाली आहे. ट्रायच्या म्हणण्यानुसार, जिओ लॉंच होण्यापूर्वी प्रत्येक भारतीय ग्राहक एका महिन्यात केवळ 154 एमबी डेटा वापरत होता. आता डेटा वापराचा आकडा 100 पटीने वाढून प्रति ग्राहक प्रति महिना 15.8 GB पर्यंत पोहोचला आहे. दुसरीकडे, जिओ वापरकर्ते दरमहा सुमारे 20 GB डेटा वापरतात. जे यापेक्षा जास्त आहे.

बातम्या आणखी आहेत...