आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Reliance Jio Network Down Update; Current Problems And Outages Today Latest News

फेसबूकनंतर आता जिओ?:देशभरातील जिओ नेटवर्कमध्ये सकाळपासून त्रस्त आहेत ग्राहक, कॉलिंगसह आणि इंटरनेट कनेक्शनच्या अडचणी

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबूक, व्हाट्सॲप आणि इंस्टाग्रामनंतर आता देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीच्या ग्राहकांना आउटेजचा फटका बसला आहे. देशभरात बुधवारी सकाळपासूनच नेटवर्कच्या समस्या येत आहेत. काही ठिकाणी कॉलिंग होत नाही. तर काहींनी इंटरनेट आणि दोन्ही कनेक्शन स्थापित होत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. अनेकांना तर केवळ नेटवर्क एरर असाच मेसेज येत आहे. त्यात काही ग्राहक असेही आहेत ज्यांना काहीही त्रास झालेला नाही.

टेलिकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) च्या आकडेवारीनुसार, रिलायंस जिओकडे 40.4 कोटी ग्राहक आहेत. जिओच्या नेटवर्कमध्ये समस्या आल्यानंतर आता लोकांनी जिओला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नुकताच फेसबूकला आउटेजचा सामना करावा लागला होता आता जिओला तशाच समस्येला सामोरे जावे लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...