आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रिलायन्सची 43 वी सभा:अलिबाबा, हुवावेच्या मार्गावर रिलायन्स जिओ; गुंतवणूक आकडा 1.52 लाख कोटी

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पेट्रोकेमिकलऐवजी तंत्रज्ञान कंपनी म्हणून ओळखण्याची रिलायन्सला इच्छा
  • कंपनीने रिटेल आणि कम्युनिकेशन तंत्रज्ञानाला ठरवले मूलमंत्र

९० च्या दशकात गुजरातच्या जामनगरची जगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण प्रकल्प स्थापन करून जगाचे लक्ष आकर्षित करून घेणारी रिलायन्स आता पेट्रोकेमिकल कंपनीचा शिक्क्यातून सुटका करू इच्छित आहे. रिलायन्स जगात आता आपल्या चार वर्षे जुन्या जिओच्या स्वरूपात आेळख निर्माण करू इच्छित आहे. ही प्रामुख्याने एक तंत्रज्ञान कंपनी आहे. रिलायन्सवर लक्ष ठेवणाऱ्या व्यक्तींनुसार, जिओच्या माध्यमातून कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी चीनमध्ये अलिबाबाने रिटेल आणि हुवावेने संपर्क तंत्रज्ञानात जे साध्य केले ते करू इच्छित आहेत. जगातील सर्व अग्रणी देश सध्या फाइव्हजीबाबत काम करत आहेत. अमेरिका, चीन, द. कोरिया आणि जपान अशा देशांत समाविष्ट आहे, ज्यांच्याकडे फाइव्हजी तंत्रज्ञान सध्या आहे. सर्वात स्वस्त पर्याय उपलब्ध केल्यामुळे चीनच्या हुवावेकडे सर्वात जास्त बाजार हिस्सेदारी आहे. बाजार विश्लेषकांनुसार, हेरगिरीच्या आरोपामुळे चीन हुवावेपासून लांब सरकत आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांच्याकडे स्वस्त पर्याय नाही. जिओ आणि हुवावेच्या स्पर्धेत(याची शक्यता कमी) दर्जा आणि किमतीचा विचार केल्यास त्यांना खूप मोठी बाजारपेठ मिळू शकते. याच पद्धतीने जिओ जागतिक कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये मोठा खेळाडू होऊ शकते. एवढेच नव्हे तर जिओ चीनमध्ये एक वेळ अलिबाबा ज्या मार्गावर चालत होती त्या मार्गाने पुढे जात आहे. अलिबाबाने चीनच्या लहान व्यावसायिकांना इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातील खरेदीदारांसोबत जोडले होते. रिलायन्सकडून सादर केल्या जात असलेल्या जिओ मार्टला याची सुरुवात मानली जाते. देशातील किराणा व्यावसायिकांसाठी लवकरच यात एमएमईही जोडू शकते. एका मोठी सिक्युरिटी कंपनीचे रिसर्च अॅनालिस्टने सांगितले की, मुकेश अंबानी अशा मार्गावर चालत आहेत, ज्यावर दशकभराआधी चीनच्या दिग्गज कंपन्या चालत होत्या. त्यामुळेच कदाचित सर्वसाधारण सभेत अंबानी सतत जिओला एक स्टार्टअप संबोधत होते. विश्लेषकाने सांगितले की, १० वर्षे जुन्या अलिबाबा आणि हुवावेच्या तुलनेत जिओला एक वाढ मिळाली आहे. ती अशी की, जिओला एखाद्या व्हेंचर कॅपिटलची गरज नाही व दुसरे जगातील सर्वात मोठ्या इंटरनेट कंपन्या गुगल आणि फेसबुक आता तिच्या स्पर्धक नाहीत.

जिओत थांबल्यावर रिलायन्स रिटेलमध्ये सुरू होऊ शकते गुंतवणुकीची प्रक्रिया

मुकेश अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणुकीची प्रक्रिया थांबवण्याची घोषणा केली, मात्र यासोबत हेही संकेत दिले की, समूहामध्ये आता विदेशी गुंतवणूकदारांचा टप्पा सुरू राहील. नवी गुंतवणूक रिलायन्स रिटेलमध्ये येऊ शकते. अंबानी म्हणाले, स्ट्रॅटेजिक आणि फायनान्शियल इन्व्हेस्टर्सने रिलायन्स रिटेलमध्ये आपला रस दाखवला आहे. येत्या काही तिमाहीत आम्ही रिलायन्स रिटेलमध्ये ग्लोबल पार्टनर व गुंतवणूकदार येतील.

तीन महिन्यांत जमा केले २,१२,८०९ कोटी रुपये

उद्दिष्टापूर्वी कर्जमुक्त झालेल्या अंबानी यांनी सांगितले की, रिलायन्सने हक्कभाग विक्री, जिओ प्लॅटफाॅर्म्समध्ये गुंतवणूक आणि बीपीसोबत संयुक्त प्रकल्पातून एकूण २,१२,८०९ कोटी रु. जमा केले आहेत. त्यांनी सांगितले की, आमच्या वित्तीय वर्ष २०१९-२० च्या नेट डेट १,६१,०३५ कोटींपेक्षा जास्त आहे. रिलायन्स आता एक शून्य कर्ज कंपनी आहे, तीही मार्च २०२१ च्या आमच्या ठरलेल्या मर्यादेच्या खूप आधी ठरली आहे. या बळकट ताळेबंदाच्या जोरावर आम्ही आपले तीन व्यवसाय जिओ, रिटेल आणि ओटूसीला नव्या उंचीपर्यंत घेऊन जाऊ शकतो.

जिओत ७.७ टक्के हिस्सेदारीसाठी गुगल कंपनी करणार ३३,७३७ कोटी रुपये गुंतवणूक

जगातील सर्वात मोठी इंटरनेट कंपनी गुगल जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ७.७% हिस्सेदारीसाठी ३३,७३७ कोटी रु. गुंतवणूक करेल. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सर्वसाधारण सभेत स्वत: याची घोषणा केली. अंबानींनी सांगितले की, जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुगलचा आपल्या रणनीतिक भागीदाराच्या रूपात स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. गुगलसोबत आम्ही बायडिंग पार्टनरशिप आणि इन्व्हेस्टमेंट अॅग्रीमेंट केले आहे. गुगलच्या गुंतवणुकीसोबत रिलायन्समध्ये आता गुंतवणुकीचा आकडा १.५२ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या पद्धतीने आतापर्यंत १४ कंपन्यांनी जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. अंबानी यांनी सांगितले की, गुगलच्या गुंतवणुकीसोबत जिओत हिस्सेदारी विकण्याची प्रक्रिया थांबली आहे. आता यामध्ये केवळ रणनीतिक भागीदारीच दिली जाईल.