आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Reliance Jio | Vista Equity Partners Picks 2,32 Percent Stake In Jio Platforms For Rs 11,367 Crore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आणखी एक करार:रिलायन्सने व्हिस्टा इक्विटीला जिओची 2.32% हिस्सेदारी विकून 11,367 कोटी रु.जमा केले

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरआयएलने 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीत रिलायन्स जिओचा 13.46 टक्के हिस्सा विकला
  • रिलायन्स इंडस्ट्रीजला जिओ हिस्सेदारीच्या विक्रीपासून आतापर्यंत 60,597 कोटी रुपये मिळाले आहेत

मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज कर्जमुक्त होण्याच्या आपल्या नियोजनात वेगाने पुढे जात आहे. अमेरिकी कंपनी व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सने रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडमध्ये ११,३६७ कोटी रुपयात २.३२% हिस्सेदारी खरेदी केली आहे. केवळ १६ दिवसांत रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्सची हिस्सेदारी विकून एकूण ६०,५९६.३७ कोटी जमा करण्यात यशस्वी राहिली. याआधी २२ एप्रिलला फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्म्सची ९.९९% हिस्सेदारी फेसबुकला विकून ४३,५७४ कोटी रु. जमा केले होते. यानंतर या आठवड्यात ४ मे रोजी अमेरिकी प्रा. इक्विटी फर्म सिल्व्हर लेकला १.१५% हिस्सेदारी विकून ५,६५५.७५ कोटी रुपये जमा केले होते. 

व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सने जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये नवी गुंतवणूक कंपनीचे समभाग मूल्य ४.९१ लाख कोटी रु. आणि एंटरप्राइज मूल्य ५.१६ लाख कोटी रु. ग्राह्य धरून केली.. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून शुक्रवारी केलेल्या निवेदनात यासंदर्भातील माहिती दिली आहे. धोरणात्मक आणि वित्तीय गुंतवणूकदार जिओ प्लॅटफॉर्म्सची २०% हिस्सेदारी घेऊ शकते. यामध्ये सुमारे निम्मी हिस्सेदारी फेसबुकने आधीच घेतली आहे. सिल्व्हर लेक आणि व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सही अशा प्रकारची गुंतवणूकदार कंपनी आहे. व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सचे सहसंस्थापक ब्रायन शेठ भारतीय-अमेरिकी आहेत. त्यांचे वडील गुजरातचे मूळ रहिवासी आहेत. 

जगातील पाचवी मोठी एंटरप्राइजेस सॉफ्टवेअर कंपनी आहे व्हिस्टा

व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सजवळ ५,७०० कोटी डॉलरपेक्षा जास्त अंदाजित कॅपिटल कमिटमेंट्स आहे. तिचे ग्लोबल नेटवर्क जगातील पाचवी सर्वात मोठी एंटरप्राइजेस सॉफ्टवेअर कंपनी बनवते. व्हिस्टाच्या पाेर्टफोलिओच्या कंपन्यांची भारतात चांगली पकड आहे. यामध्ये १३ हजारपेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत.

केवळ चार वर्षांत रिलायन्स जिओने देशात ३९ हजार युजर केले

निवेदनानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजची पूर्ण मालकीची अानुषंगिक कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्स एक पुढील पिढीची डिजिटल टेक्नॉलॉजी कंपनी आहे. दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ, जिओ अॅप आणि तेज गतीची इंटरनेट सेवा याअंतर्गत येते. रिलायन्सने ५ सप्टेंबर २०१६ रोजी जिओ लाँच केले होते. केवळ चार वर्षांत याचे देशभरात ३८.८ कोटी युजर आहेत.

रिलायन्सला कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकते

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख ६३ वर्षीय मुकेश अंबानी यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये समूहास मार्च २०२१ पर्यंत कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट बाळगले होते. मात्र, या तीन व्यवहाराशिवाय ५३,१२५ कोटी रुपयाचे राइट्स इश्यू जारी करणे आणि सौदी अरामकोसारख्या कंपन्यांची आणखी हिस्सेदारी विकून डिसेंबरपर्यंत प्राप्त करण्याची आशा आहे. मार्चअखेरपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजवर एकूण ३,३६,२९४ कोटी रु. कर्ज थकीत आहे. 

जिओ देशातील तिसरी मोठी मूल्यवान कंपनी झाली

व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स करारासह जिओ प्लॅटफाॅर्मची एंटरप्राइज व्हॅल्यू ५.१६ लाख कोटी रु. झाली आहे. हे मूल्यांकनासह देशातील तिसरी मोठी मूल्यवान कंपनी झाली आहे.  या कंपनीच्या पुढे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच आहेत.

एशियन पेंट्सची ४.९% हिस्सेदारी विकून ७,५०० कोटी मिळण्याची आशा

रिलायन्स इंडस्ट्रीजला कर्जमुक्त करण्यासाठी कंपनीचे सीएमडी मुकेश अंबानी आता एशियन पेंट्समध्ये ४.९% हिस्सेदारी विकण्याचा विचार करत आहे. ब्लूमबर्गनुसार, या विक्रीतून रिलायन्सला ९८.९ कोटी डॉलर(सुमारे ७,५०० कोटी रु.) मिळण्याची आशा आहे. यासाठी त्यांनी बँकांशी चर्चा सुरू केली आहे. बाजार भांडवलाच्या हिशेबाने एशियन पेंट्स देशातील सर्वात मोठी पेंट कंपनी आहे. बीएसईमध्ये शुक्रवारी कंपनीचे बाजार भांडवल १,५१,३५१.८२ कोटी रु. राहिले. १९४२ मध्ये स्थापन एशियन पेंट्स १५ देशांत २६ प्लँट्समध्ये पेंटचे उत्पादन करते.

तंत्रज्ञानात बदल घडवण्याची शक्ती सुखकर भविष्याची किल्ली : मुकेश अंबानी

व्हिस्टाशी एका महत्त्वाच्या भागीदारीचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. ही जगातील मोठ्या विशिष्ट टेक गुंतवणुकदारांपैकी एक आहे. अन्य भागीदारांप्रमाणे व्हिस्टाही समान दृष्टीकोन बाळगते. . तंत्राानातील बदल आणण्याची शक्ती सुखकर भविष्याची किल्ली आहे. - मुकेश अंबानी, सीएमडी, रिलायन्स इंडस्ट्रीज

रिलायन्स पुन्हा १० लाख कोटी बाजार भांडवलाची कंपनी

रिलायन्स इंडस्ट्रीजने शुक्रवारी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. कंपनी पुन्हा एकदा शेअर बाजारात १० लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाची कंपनी झाली आहे. याआधी कंपनीने प्रथमच हा ऐतिहासिक आकडा २८ नोव्हेंबर २०१९ रोजी स्पर्ध केला होता. बीएसईमध्ये गुरुवारी सायं. ७ मे रोजी कंपनीचे समभाग १,५०७.२५ रुपयावर बंद झाले होते. शुक्रवारी व्यवसायादरम्यान दुपारी १.१३ वाजता हा १,५०७.२५ रुपयाच्या उंचीवर स्पर्श करण्यात यशस्वी झाला होता. यासोबत रिलायन्सचे बाजार भांडवल १०,००,९२८.४० कोटी रु. झाले होते. असे असले तरी सायंकाळी कंपनीचे समभाग ३.६२% वाढीसह १,५६१.८० रुपयावर बंद झाले. कंपनीचे बाजार भांडवल घटून ९,९०,०८८.०२ कोटी रु. राहिले.

बातम्या आणखी आहेत...