आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना काळातही मुकेश अंबानींचा दबदबा:रिलायन्स रिटेल ठरली जगातील दुसरी वेगवान विक्रेता; जागतिक यादीतील एकमेव भारतीय कंपनी

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जागतिक स्तरांवरील या यादीमध्ये अमेरिकेची रिटेल दिग्गज कंपनी वॉलमार्ट इंक अव्वल स्थानावर आहे

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने कोरोनाकाळातही दबदबा कायम ठेवली आहे. अंबानी यांची रिलायन्स रिटेल कंपनी जगातील सर्वात वेगाने वाढणारी दुसर्‍या क्रमांकाची रिटेल कंपनी बनली आहे.

कोरोना महामारीमुळे उद्योग समुहाचे खूप मोठे नुकसान झालेले असून कित्येक मोठ्या इंड्रस्ट्रीज डबघाईला आलेल्या होत्या. तरीदेखील मुकेश अंबानी यांची रिलायन्स रिटेल कंपनी तेवढ्याच झपाट्याने वाढत आहे. डेलॉयच्या ग्लोबल रिटेल पॉवर हाऊस 2021 च्या अहवालानुसार, रिलायन्स रिटेलने यावर्षी जागतिक स्तरावर 53 वे स्थान मिळविले आहे. तर गेल्या वर्षी रिलायन्स रिटेल कंपनी 56 व्या स्थानी होती.

अमेरिकेची वॉलमार्ट प्रथम क्रमांकावर
जागतिक स्तरांवरील या यादीमध्ये अमेरिकेची रिटेल दिग्गज कंपनी वॉलमार्ट इंक अव्वल स्थानावर आहे. वॉलमार्टने पुन्हा एकदा आपले स्थान कायम ठेवले आहे. दरम्यान, ॲमेझॉन डॉट कॉमच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून त्याने जागतिक क्रमवारीत दुसरे क्रम पटकावले आहे. अमेरिकेची रिटेल कंपनी कोस्टो होलसेल कॉर्पोरेशन एका स्थानावरून खाली येऊन तिसर्‍या स्थानावर आली आहे. त्याचबरोबर जर्मनीची रिटेल कंपनी श्वार्जने जर्मनीच्या ग्लोबल रँकिंगच्या ग्रुपमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

बातम्या आणखी आहेत...