आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी डील:मुकेश अंबानी यांनी 620 कोटी रुपयांत खरेदी केली ई-फार्मा कंपनी 'नेटमेड्स'

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुकेश अंबानी यांनी आपल्या रिटेल व्यापारासाठी एक मोठी डील केली आहे. रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL)ने दिलेल्या माहितीनुसार, रिलायंस रिटेल वेंचर्स लिमिटेड (आरआरवीएल) ने डिजिटल फार्मा मार्केट प्लेस नेटमेड्समध्ये मेजॉरिटी शेअर खरेदी केले आहेत.

620 कोटी रुपयांची गुंतवणूक

रिलायंस इंडस्ट्रीजने ऑनलाइन फार्मसी कंपनी नेटमेड्समध्ये 620 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. रिलायंसने विटालिक हेल्थ आणि त्याच्या सब्सिडियरी कंपन्यांमधील 60 भागीदारी विकत घेतली आहे. यालाच सामुहिकरित्या नेटमेड्स म्हटले जाते. रिलायंसने सहायक कंपन्या असलेल्या त्रिसारा हेल्थ प्राइवेट लिमिटेड, नेटमेड्स मार्केट प्लेस लिमिटेड आणि दाधा फार्मा डिस्ट्रिब्यूशन प्राइवेट लिमिटेडमध्ये 100 टक्के भागीदारी विकत घेतली आहे.

काय आहे नेटमेड्स कंपनी

नेटमेड्स एक ई-फार्मा पोर्टल आहे, यातून प्रिस्क्रिप्शन आधारित आणि ओवर-द-काउंटर औषधे व हेल्थ उत्पादनांची विक्री होते. याच्या सेवा देशातील 20,000 ठिकाणी उपलब्ध आहेत. याशिवाय कंपनी औषधांची डोर स्टेप डिलीव्हरी करते. याची प्रमोटर चेन्नईमधील दाधा फार्मा आहे. 2015 मध्ये या कंपनीची स्थापना झाली होती.

अॅमेझॉन-फ्लिपकार्टला टक्कर

ई-काॅमर्स कंपनी अॅमेझॉनने ऑनलाइन फार्मसी क्षेत्रात उतरण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बंगळुरूवरुन ई-फार्मसी सेवा सुरू केल्या आहेत. तर, फ्लिपकार्टदेखील लवकरच या क्षेत्रात उतरणार आहे. कंपनीची अनेक फार्मा स्टार्टअपसोबत बातचीत सुरू आहे. त्यामुळे या तिन्ही कंपन्यांची चांगलीच स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...