आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओची 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जिओ यावर्षी दिवाळीपर्यंत 5G सेवा सुरू करेल. हे सर्वप्रथम मेट्रो शहरांमध्ये सादर केले जाईल. पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत ते देशभरात सादर केले जाईल.
यासोबतच कंपनीने 5G जिओ फोनचीही घोषणा केली आहे. कंपनी गुगलसोबत भागीदारी करत आहे. Jio Phone 5G कधी लॉंच होईल, त्याची किंमत आणि फीचर्स काय असतील याबद्दल जास्त माहिती देण्यात आलेली नाही. 2021 मध्ये, रिलायन्स जिओने Google च्या सहकार्याने Jio Phone Next 4G फोन लॉन्च केला आहे.
5G हा सर्वात स्वस्त पर्याय असू शकतो
Jio Phone 5G या वर्षाच्या अखेरीस लॉंच केला जाऊ शकतो. जर आपण फोनच्या अपेक्षित किंमतीबद्दल बोललो तर ते 10 हजार-12 हजार रुपये असू शकते. Jio Phone 5G हा 5G विभागातील सर्वात स्वस्त पर्याय असू शकतो. त्याचवेळी, आणखी एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की या फोनची किंमत 2,500 रूपयांपासून कमी असू शकते.
दरम्यान, 5G स्मार्टफोनची किंमत इतकी कमी आहे. यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे. अशा परिस्थितीत, ही किंमत Jio Phone 5G फोनसाठी डाउन पेमेंट मानली जाऊ शकते. याशिवाय या फोनसोबत बंडल डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचे फायदे मिळू शकतात, असेही सांगितले जात आहे.
जिओ फोन 5G अपेक्षित वैशिष्टये
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.