आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Repo Rate Likely To Rise 0.60% By Dec 2 2, Expectations Boosted By Faster Growth: DBS

व्याजदर आणखी वाढू शकतात:रेपो रेट डिंसेबर-2 2 पर्यंत 0.60% वाढण्याची शक्यता, वेगवान विकास दरामुळे वाढली अपेक्षा :  डीबीएस

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या अर्थव्यवस्थेत जलद वाढीच्या संभाव्यतेमुळे कर्जाचे व्याजदर आणखी वाढू शकतात. डीबीएस ग्रुप रिसर्चच्या अहवालानुसार, चलनवाढ रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे रेपो दरात ६० बेस पॉइंट्स किंवा ०.६०% अधिक वाढ करण्याची संधी आहे.

गुरुवारी आय डीबीएसच्या अहवालात म्हटले की, सप्टेंबरमध्ये आरबीआय रेपो रेटमध्ये ०.३५% वाढ करू शकतो. डिसेंबरपर्यंत यात ०.२५%च्या आणखी एका वाढीनंतर रेपो रेट ६.०% च्या पातळीवर पोहोचेल. केंद्रीय बँक धोरण दर (रेपो रेट) मध्ये आतापर्यंत १.४०%ची वाढ झाली आहे. ऑगस्टमध्येच आरबीआयने यात ०.५०% वाढ केली.

डीबीएसच्या मते, कोरोनाच्या प्रभावापासून भारतीय अर्थव्यवस्थे तेजी आली आहे. जीडीपीमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा विकास दर १६% पर्यंत पोहोचेल असा डीबीएसच्या अहवालात अंदाज आहे. ही ताकद आरबीआयला दर वाढवण्यास प्रोत्साहन देऊ शकते.

आशियात सर्वात जास्त वाढ पाहू शकतो भारत डीबीएस ग्रुप रिसर्चचे वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ राधिका राव यांच्या मते, सेवा क्षेत्राचे कामकाज रूळावर आल्याने अर्थव्यवस्थाने वेग धरला आहे. चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा वृद्धी दर ७% राहण्याचा अंदाज. यामुळे भारत आशियातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येऊ शकतो. कोविड लसीच्या यशामुळे आणि लॉकडाऊन उठवल्यामुळे, शहरी खप वाढला, बेरोजगारीचा दर कोविडपूर्वीच्या पातळीवर परत आला आणि गुंतवणूक पुन्हा एकदा वाढू लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...