आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Report: Three Weeks Lockdown Will Hurt The Country's Economy By Rs 9 Lakh Crore, Says Barclays Bank

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिपोर्ट: तीन आठवड्यांच्या लॉकडाउनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार, बार्कलेज बँकेची रिपोर्ट

Mumbai8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बार्कलेजने यावर्षी जीडीपी ग्रोथच्या अंदाजात 2% घट केली

नवी दिल्ली- कोरोना व्हायरसमुळे देशात लागू केल्ल्या तीन आठवड्यांच्या लॉकडाउनचा परिणाम देशाच्या अर्थ्यव्यवस्थेवर पडणार आहे. देशातील 21 दिवसांच्या लॉकडाउनमुळे एप्रिल-जून तिमाहीचा जीडीपी ग्रोथ वेगाने कमी होईल. यामुळे वर्षभराच्या ग्रोथवर परिणाम पडेल. लॉकडाउनमुळे देशालला अंदाजे 120 अब्ज डॉलर (9.12 लाख कोटी रुपये) नुकसान होण्याची शक्यता आहे. हे एकूण जीडीपीच्या 4% आहे. या गोष्टीला लक्षात घेता, जीडीपी ग्रोथचा अंदाजच कमी केला आहे. रिपोर्टनुसार, यावर्षीची जीडीपी ग्रोथ 2% कमी येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केलेल्या घोषणेनंतर बार्कलेज बँकने अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाबाबत एक रिसर्च रिपोर्ट तयार केली आहे.

यावर्षीची ग्रोथ 4.5% ने कमी होऊन 2.5% होईल
बार्कलेज इंडियाचे चीफ इकोनॉमिस्ट राहुल बजोरिया म्हणतात की, चार आठवडे देश पूर्णपणे बंद आणि त्यानंतर आठ आठवड्यांसाठी काही अंशी बंद होईल असे समजून ही रिपोर्ट तयार केली आहे. 2020 मध्ये ग्रोथचा अंदाज 4.5% वरुन कमी होऊन 2.5% आणि पूर्ण आर्थक वर्ष (2020-21) साठी 5.2% कमी होऊन 3.5% केला आहे. पण, पुढील वर्षी ग्रोथमध्ये गती येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार, 2021 मध्ये जीडीपी ग्रोथ 8.2% आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 8% असेल.

ऑगस्टपर्यंत आरबीआय व्याज दर 1.65% कमी करू शकते
बँकेचा पहिला अंदाज होता की, संभाव्य मंदी पाहता आरबीआय व्याज दर 65 बेसिस पॉइंट कमी करेल. पण आता म्हटले आहे की, रेट कट अजून जास्त होईल. बार्कलेजच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आरबीआय एप्रिलच्या मौद्रित रणनिती आढाव्यात 65 बेसिस पॉइंट कमी करेल. जून-ऑगस्ट च्या आढाव्यात 100 बेसिस पॉइंट कमी होण्याची शक्यता आहे.

सरकारचा आर्थित घाटा 3.5% ऐवजी 5% राहण्याची शक्यता

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जीडीपी ग्रोथमध्ये होणाऱ्या कमीमुळे सरकारला आर्थिक ध्ये गाठण्यासाठी अडचणी येऊ शकतात. अशातच आरबीआयकडून पैशांची मागणी होऊ शकते. वार्कलेजने सरकारच्या अंदाजे जीडीपीला 3.5% ऐवजी आता 5% केला आहे.