आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Rera, GST Benefit Organized Real Estate; In 3 Years The Stake Increased From 17 To 40 Per Cent

रिअल इस्टेट:रेरा, जीएसटीसारख्या नियमांमुळे संघटित रिअल इस्टेटला फायदा; 3 वर्षांत हिस्सेदारी 17 वरून वाढत 40 टक्के

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अडचणी टाळण्यासाठी ब्रँडेड डेव्हलपर्सकडून घर खरेदीस प्राधान्य देताहेत लोक

निवासी स्थावर मालमत्ता क्षेत्रात रेरा आणि जीएसटीसारखे नियम लागू झाल्यानंतर संघटित क्षेत्र म्हणजे ब्रँडेड लिस्टेड आणि टॉप अनलिस्टेड कंपन्यांची हिस्सेदारी आधीपेक्षा वाढली आहे. वित्त वर्ष २०१७ मध्ये जिथे ब्रँडेड आणि टॉप अनलिस्टेड कंपन्यांची हिस्सेदारी एकूण विक्रीत १७ टक्के होती, तिथे वित्त वर्ष २०२१ च्या आधी ९ महिन्यांत (एप्रिल ते डिसेंबर २०२०) हे वाढून ४०% झाली. मालमत्ता कन्सल्टंट एनारॉकच्या ताज्या अहवालानुसार, वित्त वर्ष २०२१ च्या पहिल्या तीन महिन्यांत देशाच्या अव्वल ७ शहरांत एकूण ९३,१४० घरे विकली. त्यात टॉप ८ लिस्टेड कंपन्यांची हिस्सेदारी २२% राहिली. प्रमुख अनलिस्टेड कंपन्यांची हिस्सेदारी १८% आणि अन्य(नॉन ब्रँडेड) रिअल इस्टेट विकासकाची हिस्सेदारी ६०% राहिली. २०१७ चा विचार करायचा झाल्यास लिस्टेड कंपन्यांची हिस्सेदारी ६% होती. अनलिस्टेड कंपन्यांची हिस्सेदारी ११% तर ८३% हिस्सेदारी इतर (नॉन ब्रँडेड) रिअल इस्टेट डेव्हलपर्सची होती. कोविड-१९ महामारीनंतरही टॉप ८ लिस्टेड कंपन्यांनी वित्त वर्ष २०२१ च्या सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये २१२.३ लाख चौ. फूट क्षेत्र विकले. हे वित्त वर्ष २०२० च्या या तिमाहीच्या तुलनेत २% जास्त आहे. या डेटातून घर खरेदी करणाऱ्या लोकांची आवडही लक्षात येते.

खरेदीदार ब्रँडेड प्रॉडक्टकडे वळताहेत
रेरा , जीएसटीसारखी सुधारणा लागू झाल्यानंतर संघटित आणि ब्रँडेड कंपन्यांची चौकशी वाढली आहे. खरेदीदार ब्रँडेड कडे वळत आहेत. केवळ लक्झरी हाउसिंगच नव्हे, तर परवडणारे व मध्यम उत्पन्न श्रेणीतही लिस्टेड आणि प्रमुख नॉन-लिस्टेड कंपन्या नवी मागणी पूर्ण करण्यात जुंपल्या आहेत. -अनुज पुरी, चेअरमन, एनारॉक

बातम्या आणखी आहेत...