आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करार:एनएमआयएमएस व व्हर्जिनिया टेकदरम्यान संशोधन सहयोग

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एनएमआयएमएस डीम्ड-टु-बी विद्यापिठाने १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी आपल्या मुंबई कँपसमध्ये व्हर्जिनिया पॉलिटेक्निक इंस्टिट्यूट आणि स्टेट विद्यापिठा (व्हर्जिनिया टेक)च्या एका वरिष्ठ नेतृत्वातील शिष्टमंडळाचे आयोजन केले. कार्यक्रमाचा उद्देश शैक्षणिक तज्ञांना एकत्र आणणे आणि सहयोगी संशोधन, अभ्यासक्रम विकास, इंटर्नशिप आणि विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट वाढवणे हा होता. एनएमआयएमएस मुकेश पटेल स्कूल आॅफ टेक्नोलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग आणि व्हर्जिनिया टेकदरम्यान आधीपासूनच विविध कार्यक्रमांसाठी सहयोग मिळाला आहे. एसव्हीकेएम आणि एनएमआयएमएसचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मान्यवर सदस्यांमध्ये अमित सेठ, सचिव, व्यवस्थापकीय समिती, एसव्हीकेएम, शालिन दिवातिया, समिती सदस्य, एसव्हीकेएम, डॉ. रमेश भट, कुलगुरू, एसव्हीकेएम, डॉ. शरद म्हैसकर, प्र-कुलगुरू, डॉ. मीना चिंतामने यांचा समावेश होता. प्र-कुलगुरू आणि अनेक विभागप्रमुख सदस्य, डीन, असोसिएट डीन आदी यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...