आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बूस्टर डोस:आरोग्य क्षेत्राला रिझर्व्ह बँकेचे प्रोत्साहन; 50 हजार कोटींची टर्म लिक्विडिटी जाहीर

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रिझर्व्ह बँकेने दिली सुखद बातमी

आरोग्य आणि औषधी क्षेत्रासाठी रिझर्व्ह बँकेने ५०,००० कोटींच्या टर्म लिक्विडिटी फॅसिलिटीची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत बँका लस निर्माते, लस आणि वैद्यकीय उपकरणे आयात करणाऱ्या कंपन्या, रुग्णालये, डिस्पेन्सरी, पॅथॉलॉजी लॅब्ज, ऑक्सिजन उत्पादक आणि वितरक, व्हेंटिलेटर निर्माते व हे आयात करणाऱ्या कंपन्या, कोविड-१९ ची औषधी आणि कोविड-१९ शी संबंधित लॉजिस्टिक सपोर्ट देणाऱ्या कंपन्यांना कर्ज देऊ शकतील. कर्ज खिडकी ३१ मार्च २०२२ पर्यंत खुली राहील. याच पद्धतीने कर्ज देणाऱ्या बँकांसाठी प्रायोरिटी स्टेटसही ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या म्हणण्यानुसार, आमचा सर्वात पहिला उद्देश लोकांचा जीव आणि आयुष्य वाचवणे आहे. देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे भयावह स्थिती निर्माण केली आहे. यामुळे देशाची आरोग्य व्यवस्था ढेपाळली आहे. आरोग्य आणि औषध क्षेत्राला या भीषण संकटातून उभारी येण्यासाठी संजीवनीची तातडीने गरज होती. विश्लेषकांनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संकटाचा सामना करणाऱ्या हेल्थ आणि फार्मा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ही घोषणा बरीच उत्साहवर्धक ठरेल.

कोविड रुग्ण उपचारासाठी घेऊ शकतील बँकेकडून कर्ज : रिझर्व्ह बँकेच्या ५०,००० कोटींच्या प्रोत्साहन योजनेनंतर कोविड-१९ रुग्णांना उपचारासाठी बँकांचे कर्ज मिळण्यास सुलभता येईल. या योजनेअंतर्गत बँक रुग्णालय आणि आरोग्यनिगा तसेच फार्माशी संबंधित व्यावसायिकांशिवाय अशारुग्णांनाही कर्ज देऊ शकतील, ज्यांना कोविड-१९ च्या उपचारात त्याची आवश्यकता आहे.

अर्थतज्ज्ञांनी प्रोत्साहन योजनेचे स्वागत केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, महारोगराईच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य सेवा कोलमडली होती. अर्थव्यवस्थेलाही बरेच नुकसान होण्याची शक्यता हाेती. रिझर्व्ह बँकेने या प्रोत्साहन उपायांत बरीच मदत केली.

कौतुकास्पद पाऊल; अर्थतज्ज्ञांचा सूर

लहान व मध्यम उद्योग(एमएसएमई) अतिरिक्त लिक्विडिटी विंडो आणि कर्ज पुनर्गठनाची प्रणाली मिळाल्याने महामारीदरम्यान आपली वित्तीय स्थिती बळकट करू शकतील. आरबीआय या संकटाच्या काळात अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी योग्य पाऊल उचलत राहील, अशी आशा आहे. - रजीन सिन्हा, मुख्य अर्थतज्ज्ञ, नाइट फ्रँक

तीन वर्षांच्या सुविधेअंतर्गत बँक ५०,००० कोटीपर्यंत कर्ज देऊ शकते. मेडिकल,हेल्थकेअर सुविधेला तत्काळ मदत देण्याचा चांगला उपाय आहे. याचा फायदा दीर्घावधीपर्यंत मिळेल. मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूटलाही लाभ मिळेल. - डॉ. जोसेफ थॉमस, संशोधन प्रमुख, एमके वेल्थ मॅनेजमेंट

आरबीआयच्या बूस्टर डोसने १३ टक्के उसळले शेअर
रिझर्व्ह बँकेच्या प्रोत्साहनानंतर प्रमुख फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसली. बीएसई आरोग्यनिगा निर्देशांक ७१३ अंक वाढून २४,०३९ वर बंद झाला. निफ्टी फार्मा इंडेक्स ५४५ अंकांच्या उसळीसह १३,७८० वर बंद झाला. हा आदल्या दिवसाच्या तुलनेत ४ टक्क्यांपेक्षा जास्तीच्या वाढीत होता. सर्वात जास्त उसळी १३.४७% उसळी लुपिनच्या शेअर्समध्ये नोंेदली.

बातम्या आणखी आहेत...