आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Reserve Bank Of India Monetary Policy Meeting June, No Change In Repo Rates, GDP Growth Rate Declined

भारतीय रिझर्व्ह बँकेचे पतधोरण:दरांमध्ये कुठलेही बदल नाही, पण विकास दराचा अंदाज घटवला; चालू आर्थिक वर्षात 10.5% आता नव्हे तर 9.5% विकास दराचा अंदाज

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरणात व्याज दरांमध्ये कुठलाही बदल केला नाही. आरबीआयच्या पत धोरण समितीने तीन दिवसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला. तोच निर्णय आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी जारी केला आहे.

सध्याचे रेट काय?

  • रेपो रेट 4.00%
  • रिव्हर्स रेपो रेट 3.35%
  • मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट 4.25%
  • बँक रेट 4.25%

चालू आर्थिक वर्षाच्या विकास दराचा अंदाज घटवला
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितल्याप्रमाणे, महागाई दर कमी झाल्याने नुकत्याच काही अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. विकासाचा वेग वाढवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या धोरणावर सर्वच पक्षांचे समर्थन आवश्यक आहे. सामान्य मान्सूनमुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यात मदत मिळेल. चालू आर्थिक वर्षात यापूर्वी 10.5% विकास दर राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता त्यात घट करण्यता आली आहे. चालू आर्थिक वर्षात विकास दर 9.5% राहील असे शक्तिकांत दास म्हणाले आहेत. सोबतच, 2021-22 या आर्थिक वर्षात महागाई दर 5.1% राहील असा अंदाजही आरबीआयने वर्तवला आहे.

17 जूनपालून गव्हर्नमेंट सिक्योरिटीज विकत घेणार आरबीआय
शक्तिकांत दास यांनी सांगितले, की अर्थव्यवस्थेला मदत करण्यासाठी आरबीआय 17 जून रोजी 40 हजार कोटी रुपयांच्या गव्हर्नमेंट (जी) सिक्योरिटीज खरेदी करणार आहे. नंतर दुसऱ्या त्रैमासिकात 1.20 लाख कोटी रुपयांच्या जी-सिक्योरिटीज खरेदी केल्या जातील. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास पुढे म्हणाले की भारतात परदेशी चलन भांडार 600 अब्ज अमेरिकन डलरपेक्षा अधिक जाऊ शकते. पत धोरण समितीने 31 मार्च 2026 पर्यंत वार्षिक महागाई दर 4% करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

हॉस्पिटेलिटी, हॉटेल, पर्यटन क्षेत्राला 15 हजार कोटींचे कर्ज, कोण घेऊ शकणार?
शक्तिकांत दास यांनी सांगितले, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नुकसान झालेल्या हॉस्पिटॅलिटी सेक्टरसाठी विशेष कर्ज योजना सुरू करणार आहे. यासाठी 31 मार्च 2022 पर्यंत 15 हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले जाईल. यामध्ये ट्रॅव्हेल एजंट, टूर ऑपरेटर, एडव्हेंचर-हेरिटेजशी संबंधित सेवा देणाऱ्या, एव्हिएशन सेक्टरशी संबंधित ग्राउंड हँडलिंग आणि पुरवठा कंपन्या, खासगी बस ऑपरेटर, कार रिपेअर सेवा, टॅक्सी, इव्हेंट ऑर्गेनायजर, स्पा क्लिनिक आणि ब्यूटी पार्लर संचालक कर्ज घेऊ शकतील. या योजनेत तीन वर्षांच्या कमाल मर्यादेसह रेपो रेटवर कर्ज दिले जाणार आहे. या व्यतिरिक्त सिडबी अर्थात स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाला सुद्धा 16 हजार कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. लखनऊ येथे मुख्यालय असलेली सिडबी अर्थ मंत्रालयाच्या आधीन राहून छोट्या व्यापाऱ्यांना वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांवर लक्ष ठेवते.

एप्रिलमध्ये सुद्धा काहीच बदल केले नाही
पत धोरण समितीने एप्रिल 2021 मध्ये झालेल्या बैठकीत सुद्धा रेपो रेटमध्ये कुठलेही बदल केले नाहीत. आरबीआयने रेपो रेटमध्ये बदल न केल्याची ही सलग 6 वी वेळ आहे. 2020 मध्ये आरबीआयने 115 बेसिस पॉइंटची कपात केली होती. त्यानंतर घट किंवा वाढ काहीच करण्यात आले नाही. रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम आहे. रिझर्व्ह बँकेने यापूर्वी अनेकदा रेपो रेट कमी केले. पण, बँका ग्राहकांना त्याचा पूर्ण फायदा देत नाहीत. गेल्या वर्षी कोरोना काळापासून आतापर्यंत 1.50 टक्के कपात केली. सध्या कर्जांवरील व्याज सर्वात कमी असून बँकांमध्ये असणाऱ्या रकमेवर सुद्धा सर्वात कमी व्याज मिळत आहे.

होम लोन घेणाऱ्यांसाठी चांगली संधी
प्रॉपर्टी कंसलटंट फर्म एनरॉकचे चेअरमन अनुज पुरी यांनी सांगितल्याप्रमाणे, सध्या व्याज दरात कुठलाही बदल केला नाही. त्याचा होम लोन घेणाऱ्यांसाठी फायदा होऊ शकतो. प्रामुख्याने ज्यांनी रेटो रेटच्या बेंचमार्कवर होम लोन घेतले आहे. सद्यस्थितीला रिटेल लोनचे दर 2 दशकांतील सर्वात कमी आहेत.

बातम्या आणखी आहेत...