आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेवर निर्बंध:RBIने HDFC बँकेवर घातले निर्बंध; आता बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करता येणार नाही

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डेटा सेंटरवरील कामकाजाच्या परिणामामुळे केंद्रीय रिझर्व्ह बँकेने हा आदेश दिला

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक HDFCला मोठा धक्का दिला आहे. RBIने डिजिटल लॉन्चिंग थांबवण्याचे HDFC बँकेला आदेश दिले आहेत. यामध्ये क्रेडिट कार्डचाही समावेश आहे. दरम्यान हा आदेश तात्पुरता आहे. दोन वर्षात बँकेसाठी हा तिसरा मोठा धक्का आहे.

स्टॉक एक्सचेंजमध्ये दिलेल्या माहितीत बँकेने म्हटले की, RBIने 2 डिसेंबरला दिलेल्या आदेशात म्हटले की, अलीकडेच बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, पेमेंट युटिलिटीजमध्ये वारंवार व्यत्यय येत आहेत. हे दोन वर्षांपासून चालू आहे. 21 नोव्हेंबर रोजी बँकेची इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टममध्ये गडबड दिसून आले होते. नुकत्याच 21 नोव्हेंबरला झालेल्या प्राथमिक डेटा सेंटरमधील वीज बंद झाल्यामुळे बँकेची इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टम बंद पडली होती.

बँकेच्या मंडळाने चौकशी करावी

रिझर्व्ह बँकेने आदेशात असेही म्हटले आहे की बँकेच्या मंडळाने अशा कमतरतेची चौकशी करावी आणि उत्तरदायित्वाचा निर्णय घ्यावा. आम्ही उचलेले पाऊल किंवा नियम केवळ जेव्हा बँकेकडून समाधानकारक उत्तरे मिळतील म्हणजेच सर्व काही ठीक झाल्यनंतर हटवले जातील.

बर्‍याच वेळा अशा समस्या आल्या

एचडीएफसी बँकेने म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांत त्यांनी आयटी प्रणाली मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या असून, उर्वरित काम जलद गतीने पूर्ण केले जाईल. डिजिटल बँकिंग व्यवस्थेत अलीकडील समस्या सोडविण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे बँकेने म्हटले आहे. नवीन नियामक निर्णयाचा सध्या अस्तित्वात असलेल्या क्रेडिट कार्ड, डिजिटल बँकिंग व्यवस्था आणि विद्यमान कामांवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या उपाययोजनांमुळे त्याच्या एकूण व्यवसायावर परिणाम होणार नाही, असा बँकेचा विश्वास आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser