आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:केंद्रातील मोदी सरकारला आपल्या खजिन्यातून 99,122 कोटी रुपये देणार रिझर्व्ह बँक, बोर्डाने दिली मंजुरी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) केंद्र सरकारकडे 99,122 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. 21 मे 2021 रोजी रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कोविड -19 च्या दुसर्‍या लाटेचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक व देशांतर्गत आव्हाने आणि रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या अलीकडील धोरणात्मक उपायांचा मंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.

ही रक्कम जुलै 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंतच्या नऊ महिन्यांसाठी आहे. मंडळाने असे ठरवले आहे की, रिझर्व्ह बॅंकेमध्ये आपातकालीन जोखीम बफर 5.50 % टक्के राहील. जालान समितीच्या शिफारशीनुसार रिझर्व्ह बँकेच्या खात्याचा 5.5 ते 6.5 टक्के हिस्सा आपातकालीन निधी म्हणून ठेवावा.

गेल्या वर्षी दिली होती एवढी रक्कम
यापूर्वी, बोर्डाने आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये सरकारकडे 57,128 कोटी रुपयांचे अतिरिक्त (सरप्लस) हस्तांतर करण्यास संमती दिली होती. 2019 मध्ये आरबीआयने 1,23,414 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली होती.

बातम्या आणखी आहेत...