आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानुकत्याच अमेरिकेतील दोन मोठ्या बँका दिवाळखोरीत गेल्याचा परिणाम भारतीय बँकांवर होणार नाही, असे जगभरातील बँकिंग तज्ज्ञ, अमेरिकन गुंतवणूक कंपनी जेफरीज आणि आर्थिक सेवा कंपनी मॅक्वेरीने म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, स्थानिक डिपॉझिटवर अवलंबन, सरकारी बाँडमध्ये गुंतवणूक आणि पुरेशा लिक्विडिटीमुळे भारतीय बँक मजबूत स्थितीत आहेत. काही महिन्यांपासून भारतीय बँक विदेशी बँकांच्या तुलनेत चांगली कामगिरी करत आहेत.जेफरीजनुसार, बाँडच्या किमतीतील घसरणीमुळे खासगी बँकांचे फक्त ६% भांडवल प्रभावित होईल. शासकीय बँकांवरही त्याचा परिणाम १५% च होईल. बहुतांश भारतीय बँकांनी त्यांच्या अॅसेटच्या २२-२८% च सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक केली आहे.
विदेशी बँकांच्या तुलनेत मजबूत का आहेत भारतीय बँका? भारतीय बँकांमध्ये बहुतांशी ठेवी घरगुती बचतीतून येतात ज्या दीर्घकाळ जमा असतात. बँकांच्या ठेवीत कॉर्पोरेट ठेवींचा सरासरी वाटा फक्त २२% आहे, तर घरगुती ठेवींचा वाटा ६३% आहे. भारतीय बँकांचे बाँडवरील अवलंबित्व कमी आहे, बहुतांश गुंतवणूक शासकीय बाँडमध्ये आहे. काही काळापासून शेअर बाजारात घसरण असूनही बँक शेअर चांगली कामगिरी करत आहेत.
भारतीय बँका जेफरीजच्या चाचणीत यशस्वी जेफरीजचे म्हणणे आहे की, भारताचे बहुतांश शासकीय व खासगी बँकांनी त्यांची सिलिकॉन व्हॅली बँक (एसव्हीबी) चाचण उत्तीर्ण केली आहे. यात बँकांच्या डिपॉझिटच्या क्वालिटीसह बँकेत जमा बाँडवर मॅच्युरिटीपर्यंत मार्क टू मार्केट नुकसानीचा प्रभाव मोजण्यात आला. जेफरीजच्या नुसार, भारतीय बँकांकडे दीर्घकाळ राहणाऱ्या उच्च क्वालिटीच्या डिपॉझिट आहेत.
२००८-०९ सारखी स्थिती नाही शेअर बाजाराचे ऐतिहासिक आकडे सांगतात की, २००८-०९ च्या जागतिक आर्थिक संकटात बीएसईचा बँकेक्स ७२% घसरला होता. मात्र, २०१० पर्यंत अवघ्या १८ महिन्यात तो चारपट वाढून १५१०८ वर गेला होता. या आधी २००९ मध्ये तो ३५९९ वर गेला होता. या तुलनेत गेल्या दोन दिवसात बँकेक्स फक्त ५% घसरला आहे, तर अमेरिकन बँकांच्या शेअर्समध्ये ७०% पर्यंत घसरण झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.