आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मद्य विक्री:देशातील रेस्तराँ आणि हाॅटेलकडे जमा झाला३ हजार काेटींचा मद्यसाठा, केंद्र सरकारकडे केली हाेम डिलिव्हरीची मागणी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिअर असोसिएशन, रेस्तराँ संघाची मागणी, नष्ट होणाऱ्या उद्योगाला मदत मिळावी

मद्य उत्पादकांसाेबत आता रेस्तराँ, बार आणि खाद्यपदार्थांशी संबंधित आॅनलाइन सुविधा देणाऱ्या कंपन्यांनीही सरकारकडे मद्याची हाेम डिलिव्हरी करण्यात सवलत मागितली आहे. या कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे काेराेना विषाणू संसर्गाच्या या टप्प्यात लाेकांतील परस्पर अंतर राखले जाईल, शिवाय बंदीमध्ये उद्‌ध्वस्त झालेल्या त्यांच्या कामाला उभारी मिळण्यास मदत हाेईल. बिअर उत्पादक कंपन्यांची संघटना आॅल इंडिया ब्रेव्हर्स असाेसिएशन(एआयबीए)ने यासाठी फ्लिपकार्ट, अॅमेझाॅन आणि ग्राेफर्ससारख्या ई-काॅमर्स कंपन्या आणि झाेमॅटाे व स्विगीसारख्या खाद्यपदार्थ डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांना विशेष परवाने देण्याची शिफारस केली आहे. संघटनेनुसार, कंपन्या आॅनलाइन आॅर्डर घेऊ शकतात आणि परवाना प्राप्त किरकाेळ व ठाेक मद्य विक्रेत्यांद्वारे मागणी पूर्ण करू शकतात. संघटनेने मद्यासाठी राज्याच्या अबकारी विभागांतर्गत आॅनलाइन आॅर्डर करण्यासाठी पाेर्टल स्थापन करण्याचा सल्ला दिला. भारतीय रेस्तराँ संघा(एनआरएआय)चे अध्यक्ष अनुराग कटरियार म्हणाले, आम्ही सर्व राज्य सरकारांना विनंती करताे की, आम्हाला मद्याच्या साठ्याच्या विक्रीची परवानगी दिली जावी. 

सूत्रांनुसार मद्याची आॅनलाइन विक्री व हाेम डिलिव्हरीसाठी स्विगीसारख्या कंपन्यांसाेबत प्राधिकरणांशी चर्चा सुरू आहे. कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन अल्काेहोलिक बेव्हरेज कंपनीचे महासंचालक विनाेद गिरी म्हणाले, सरकारला स्वतंत्र प्रशासित आॅनलाइन माध्यमाद्वारे मद्याची हाेम डिलिव्हरी संस्थात्मक स्वरूपात देण्यावर विचार केला पाहिजे. आम्ही यात शक्य ते सर्व सहकार्य व मदत प्रदान करू.

जगातील अन्य देशांनी परवानगी दिली, भारतातही शक्य

बिअर कॅफेचे संस्थापक आणि सीईआे राहुल सिंह म्हणाले, भारतात मद्य तीन पद्धतीत- किरकाेळ, हाेरेका (हाॅटेल, रेस्तराँ आणि केटरिंग) आणि कँटिन स्टाेअर्समध्ये विकले जाते. देशभरात हाेरेका परवान्याच्या ठिकाणांची संख्या ३०,००० आहे. सिंह म्हणाले, काेणत्याही स्थितीत कमीत कमी एका महिन्याचा साठा असताे. याचा अर्थ लाॅकडाऊनमुळे देशभरात विविध आऊटलेट्सवर ३ हजार काेटी रुपयांचा साठा आहे. आम्ही राज्य सरकारांना विनंती करताे की, आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात साठा विकण्याची परवानगी दिली जावी. जगात सर्व देशांनी असे केले आहे. येथेही हे होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...