आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटीश अब्जाधीश सर रिचर्ड ब्रॅन्सन यांची रॉकेट कंपनी व्हर्जिन ऑर्बिटने अमेरिकेच्या डेलावेअर न्यायालयात दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. नवीन निधी न मिळाल्याने हा अर्ज दाखल करण्यात आला. उपग्रह प्रक्षेपण कंपनीने आठवड्यांपूर्वी आपले ऑपरेशन बंद केले होते. पंरतू व्यवसायासाठी खरेदीदार शोधण्याची आशा आहे. कॅलिफोर्निया-आधारित कंपनीने गेल्या आठवड्यात आपल्या 750 पैकी 85% कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा प्लॅन करण्यात आला.
वर्षाच्या सुरूवातीलाचा पहिला उपग्रह प्रक्षेपणात फेल
या वर्षाच्या सुरुवातीला, व्हर्जिन ऑर्बिटचे रॉकेट यूकेच्या मातीतून पहिला उपग्रह प्रक्षेपित करण्यात अयशस्वी ठरला. त्याच्या अपयशाचे कारण रॉकेट इंधन फिल्टरचे विघटन होणे. ज्यामुळे त्याचे एक इंजिन जास्त गरम झाले. व्हर्जिन ऑर्बिटची स्थापना 2017 मध्ये झाली आणि ती सर रिचर्ड यांच्या अंतराळ पर्यटन कंपनी व्हर्जिन गॅलेक्टिकची स्पिन-ऑफ आहे. हे उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी सुधारित बोईंग 747 विमानातून रॉकेट लॉंच करतो.
व्हर्जिन ऑर्बिटमध्ये बदललेल्या बोईंग 747 विमानांमधून रॉकेट प्रक्षेपित केले जात असे. त्यानंतर रॉकेट उपग्रहाला कक्षेत बसवते.
मिशन फेल झाल्याने निधी मिळेना
व्हर्जिन ऑर्बिटच्या मोहिमेला यूकेच्या अंतराळ संशोधनासाठी मैलाचा दगड म्हणून पाहिले गेले. उपग्रह निर्मितीपासून रॉकेट आणि नवीन स्पेसपोर्ट बनवण्यापर्यंत देशाला जागतिक खेळाडू बनविण्यात मदत करण्यासाठी हे एक मोठे पाऊल असेल अशी अपेक्षा होती. मिशनच्या अपयशानंतर, व्हर्जिन ऑर्बिटने नवीन निधी उभारण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही.
2021 मध्ये व्यावसायिक सेवा केल्या सुरू
रिचर्ड ब्रॅन्सनच्या स्थापित कंपनीने 2021 मध्ये व्यावसायिक सेवा सुरू केली. त्याने व्यावसायिक, नागरी, राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय उपग्रह कक्षेत ठेवले आहेत. आतापर्यंत त्याने 33 उपग्रह कक्षेत ठेवले आहेत. व्हर्जिन ऑर्बिटचे लाँचरवन रॉकेट लाँग बीच, कॅलिफोर्निया येथे डिझाइन आणि तयार केले आहे. हे सुधारित 747-400 वाहक विमानातून हवेतून प्रक्षेपित केले जाते.
तंत्रज्ञान खरेदीदारांना करेल आकर्षित
व्हर्जिन ऑर्बिटचे सीईओ डॅन हार्ट म्हणाले, 'आम्हाला विश्वास आहे की या टीमने तयार केलेले अत्याधुनिक प्रक्षेपण तंत्रज्ञान खरेदीदारांना आकर्षित करेल. कंपनीने सांगितले की तिची एक उपकंपनी - व्हर्जिन इन्व्हेस्टमेंट - खरेदीदार शोधण्यात मदत करण्यासाठी व्हर्जिन ऑर्बिटला $31.6 दशलक्ष निधी प्रदान करेल. फाइलिंगनुसार, 30 सप्टेंबरपर्यंत त्याची मालमत्ता सुमारे $243 दशलक्ष आणि एकूण कर्ज $153.5 दशलक्ष होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.