आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Rio Tinto Chinese Companies Face to face, The Possibility Of Falling Iron Ore; The Price Of Ore Reached Rs 9,000 Per Tonne

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्चस्वाची लढाई:रियो टिंटो-चिनी कंपन्या समोरासमोर, कच्चे लोखंड घसरण्याची शक्यता; नऊ हजार रुपये प्रतिटन पोहोचले कच्च्या धातूचे दर

कॅनबेरा|बीजिंगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताच्या पोलाद उद्योगाला फायदा होण्याची शक्यता

पोलाद उद्योग जगतासाठी आधारभूत धातू मानला जातो. सध्या पोलादाची मागणी उच्च पातळीवर आहे आणि यामुळे कच्च्या लोखंडाचे भाव प्रति ९,१०० रुपयावर(१२३ डॉलर) चालत आहेत. मात्र, चीन आणि खाण कंपनी रियो टिंटो यांच्यात कच्च्या लोखंडावरील वर्चस्वासाठी सुरू असलेल्या संघर्षाामुळे याच्या किमती घटण्याचा मार्ग खुला होऊ शकतो.

चीन जगातील सर्वात सर्वात मोठा पोलाद उद्योग आहे. मात्र, पोलाद उद्योगाची मूलभूत आवश्यक घटक कच्च्या लोखंडाची चीनमध्ये कमतरता आहे. जगात कच्च्या लोखंडाची ७०% आयात एकटा चीन करतो. कच्च्या लोखंडाच्या उच्च किमतीमुळे त्यांच्या कारखान्यांचा कोंडमारा हाेत आहे. चीन हे समीकरण बदलू इच्छितो. सध्या जगात कच्चे लोखंड भांडार आणि खाणींसाठी एक खूप महत्त्वाचा भाग केवळ तीन कंपन्यांच्या ताब्यात आहे. यापैकी दोन अँग्लो-ऑस्ट्रेलियन रियो टिंटो आणि बीएचपी आहे. तिसरी कंपनी ब्राझीलची वेले आहे. तिन्ही कंपन्या एकमेकांचे हित रक्षण करून काम करतात. यामुळे कच्च्या लोखंडाच्या बाजारात एक प्रकारचा एकाधिकार आहे.

चीन या खेळात चौथा खेळाडू होण्याची संधी शोधत होता. त्यांचा हा शोध गिनीच्या सिमंडो आयर्न ओअर खाणीत पूर्ण झाला आहे. चीन हे भांडार रियो टिंटोसोबत संयुक्त उपक्रमाअंतर्गत विकसित करत आहे. गिनीमध्ये चीनने आपली अशी एक व्यवस्था उभी केली आहे, जी सिमंडोचे दोन उत्तरेतील पट्टे विकसित करेल. चिनाल्कोचे रियोसोबत सिमंडोच्या दक्षिण ब्लॉक्सवर आधीच नियंत्रण आहे. सिमंडोमध्ये सुमारे २ लाख टन कच्चे लोखंड आहे. तज्ज्ञांनुसार, सिमंडोच्या उत्तर आणि दक्षिण ब्लाक्समध्ये उत्पादन सुरू झाल्याने १५ कोटी टन वार्षिक कच्चे लोखंड बाजारात येईल. यामुळे कच्च्या लोखंडाच्या किमती प्रति टन सुमारे ७३० रुपयांपर्यंत(१० डॉलर) पडु शकतात. भाव पडल्यामुळे रियोला खूप नुकसान होऊन चीनला फायदा होईल. कारण, तो कच्च्या लोखंडाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे.

रियोला घेरण्यासाठी चीन काेणतीही कसर सोडताना दिसत नाही. सिमंडोचा उत्तर ब्लॉक विकसित करण्यास ज्या कंपनीला मंजुरी मिळाली ती गिनीतील सर्वात मोठी बॉक्साइट निर्यातदार कंपनी एसएमबी-विनिंग आहे. चीनची अॅल्युमिनियम उत्पादक कंपनी शेडोंग वेक्किओची या प्रकल्पात गुंतवणूक आहे. उत्तर ब्लॉक या व्यवस्थेच्या हातात आले आहे आणि हे खाणीपासून बंदरापर्यंत ६५० किमी रेल्वेमार्ग आणि पायाभूत सुविधा विकसित करेल. रियो व चिनाल्को खर्चात सहभागी घेतील.

भारताच्या पाेलाद उद्योगाला फायदा होण्याची शक्यता

चीन आणि रियो टिंटोतील स्पर्धेत कच्च्या लोखंडाच्या किमती घसरल्यास त्याचा फायदा भारतातील पोलाद कंपन्यांनाही मिळेल. भारत सध्या पोलाद उद्योगात चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षी भारताच्या कच्च्या लोखंडाच्या क्षेत्रात आयात कायम राहण्याची आशा आहे. अशात स्वस्त आयात देशाच्या पोलाद कंपन्यांसाठी फायदेशीर सिद्ध होईल.