आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Rising Demand For Real Estate In The Country, Surveyed By Real Estate Consultancy Firm JLL

दिलासादायक:देशात घरांच्या मागणीत वाढ, रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म जेएलएलने केले सर्वेक्षण

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 91% लोकांचे भाड्याने राहण्याऐवजी घर खरेदीस प्राधान्य

आर्थिक अनिश्चितता आणि शेअर बाजाराच्या चढ-उताराच्या वातावरणात देशातील लोकांत रिअल इस्टेट गुंतवणुकीच्या दृष्टीने एका आवडीच्या अॅसेट क्लासच्या रूपात समोर आला आहे. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म जेएलएलने आपल्या सर्वेक्षणाच्या आधारावर हा दावा केला आहे. सर्वेक्षणात उत्तर देणाऱ्या ९१ टक्के लोकांनी सांगितले की, भाड्याऐवजी येत्या सहा महिन्यांत फ्लॅट खरेदी करणे पसंत करू.

जेएलएलच्या होमबायर्स प्रेफरन्स सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आले की, भाड्याच्या घरात राहणे पसंत कराल की स्वत:च्या घरात राहू इच्छिता? त्यावर ६७% लोकांनी सांगितले की, घर एक गरजेची बाब मानतो, लक्झ री वस्तू नव्हे. जेएलएलने हे सर्वेक्षण जून ते जुलैदरम्यान केले. यामध्ये मुंबई, दिल्ली एनसीआर, बंगळुरू, पुणे, हैदराबाद आणि चेन्नईच्या लोकांची मते आजमावण्यात आली. सर्वेक्षणात समाविष्ट लोकांनी मान्य केले की, कोरोना संकटामुळे लघु मुदतीत त्यांची निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित झाली. घर खरेदीचा विषय असतो तेव्हा नोकरी सुरक्षा त्यांच्यासाठी चिंतेचा सर्वात मोठा विषय म्हणून समोर आला आहे. सर्वेक्षणात ही बाबही समोर आली की, ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक येत्या सहा महिन्यांदरम्यान मालमत्ता खरेदीवरून जास्त इच्छुक असल्याचे दिसते. ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक येत्या सहा महिन्यांदरम्यान मालमत्ता खरेदीबाबत जास्त इच्छुक दिसले.

> ६७% नी सांगितले, आपले घर एक गरज, लक्झरी नाही

> ५०% नी सांगितले, टू-बीएचके फ्लॅटला देऊ प्राधान्य

> ७५ लाख किंवा यापेक्षा कमीची मागणी होईल जास्त

रिअल इस्टेट क्षेत्र आकर्षक अॅसेट क्लासच्या रूपात

कोरोना काळात रिअल इस्टेट क्षेत्र सर्वाधिक आकर्षक अॅसेट क्लासच्या रूपात समोर आला आहे. मोठ्या संख्येत लोक घरमालक होऊ इच्छितात. वर्क फ्रॉम होम वाढल्यामुळे विकासक ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार स्टडी रूम तयार करण्याचा प्रस्ताव देत आहेत. कोरोना संकटामुळे विकासक वेगाने डिजिटल तंत्रज्ञान अंगीकारत आहेत. - रमेश नायर, सीईओ व भारत प्रमुख, जेएलएल

विकासक देयकातील सुविधेसाठी पर्यायांचा प्रस्ताव

सर्वेक्षणात ५०% पेक्षा जास्त संभाव्य खरेदीदारांनी सहा महिन्यांत घर खरेदीबाबत आपली तयारी जाहीर केली आहे. कोरोनात ही खूप उत्साहवर्धक बाब आहे. विकासकही घर खरेदी करणाऱ्यांच्या चिंतांचे समाधान करण्याबाबत अपेक्षित लवचिकता स्वीकारत आहेत. ते देयकातील सुविधेसाठी कमी डाऊन पेमेंटसह पर्याय देत आहेत. -सम्यक दास, मुख्य अर्थतज्ञ, जेएलएल