आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Rising Prices Do Not Affect Demand; Gold Imports Will Exceed 1,000 Tonnes | Marathi News

आकर्षण कायम:किंमत वाढून मागणीवर परिणाम नाही; सोने आयात हजार टनांच्या पुढे जाणार, या कारणांमुळे सोन्याची मागणी वाढणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया-युक्रेन युद्धामुळे सध्या साेन्याच्या किमती वाढलेल्या असल्या तरी त्याचा मागणीवर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. वाढलेली मागणी आणि ग्राहकांच्या आत्मविश्वासात सुधारणा झाल्यामुळे देशातील सोन्याच्या भौतिक मागणीत सातत्याने वाढ होणार असून या वर्षीही देशातील सोन्याची आयात एक हजार टनांच्या पुढे जाईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

हिरे आणि दागिने निर्यात प्राेत्साहन परिषदेचे अध्यक्ष काॅलिन शहा यांच्या म्हणण्यानुसार २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये साेन्याच्या आयातीमध्ये १४८ टक्क्यांनी वाढ झाली, तर २०१९ च्या तुलनेत ती २८ टक्के जास्त हाेती. २०२२ या वर्षात त्यात आणखी वाढ हाेण्याचा अंदाज आहे. या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये देशात साेन्याची आयात काेविडपूर्व पातळीवर गेली आहे. संयुक्त अरब अमिरातबराेबर झालेल्या करारांतर्गत साेन्याच्या आयात शुल्कामध्ये सवलत मिळणार आहे. आतापर्यंत संयुक्त अरब अमिरातहून ७० टन साेने आयात हाेत हाेते. आता ते २०० टनांवर गेले आहे. २०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षांत स्वित्झर्लंड येथून ३२ टक्के जास्त साेन्याची आयात झाली, तर गयाना येथून साेन्याच्या आयातीत ९४५ टक्के वाढ झाली आहे.

एका सर्वेक्षणानुसार, कोविड निर्बंध उठवल्यानंतर या वर्षी विक्रमी विवाह होण्याची अपेक्षा आहे. यापैकी ४२ टक्के लोकांनी लग्नात पाहुण्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचे म्हटले आहे. त्यामुळे बचत झालेल्या पैशापैकी मोठा हिस्सा दागिन्यांवर खर्च केला जाईल. पुण्यातील पीएनजी ज्वेलर्सचे एमडी आणि सीईओ सौरभ गाडगीळ म्हणाले, देशातील सोन्याच्या मागणीत लग्नाच्या दागिन्यांचा वाटा सुमारे ७० टक्के आहे. या वर्षी देशात सुमारे ४० लाख विवाह होण्याची अपेक्षा आहे.

या कारणांमुळे सोन्याची मागणी वाढणार
केडिया अॅडव्हायझरी या कमोडिटी सल्लागार कंपनीचे संचालक अजय केडिया यांनी उच्च किमती असूनही सोन्याची मागणी वाढण्याची पाच कारणे दिली आहेत.
1. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे लोक सुरक्षित ठिकाण म्हणून सोन्यात गुंतवणूक करतील.
2. शेअर बाजारात घसरण होण्याची शक्यता लक्षात घेता लोकांचा कल सोन्याकडे वाढला आहे.
3. महागाई वाढली की सोन्यात गुंतवणूक वाढते. जगभरात महागाई वाढत आहे त्यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे.
4. लग्नातील इतर खर्च वाचवून लोक सोन्यात गुंतवणूक करत आहेत, त्यामुळे भौतिक मागणी वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...