आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन संशोधन:मालमत्तेचे वाढते मूल्य अर्थव्यवस्थेसाठी नुकसानदायक

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२००७-०८ मधील जागतिक आर्थिक संकटामुळे संपत्ती कमी होण्याच्या परिणामांवर संशोधन वाढले. अनेक आर्थिक समस्यांचे मूळ कारण जमीन आहे, असे संशोधन गेल्या काही वर्षांत समोर आले आहे. त्यांच्या मते, जमिनीच्या चढ्या किमती कर्ज, गुंतवणूक आणि शेवटी उत्पादकतेवर परिणाम करतात. संशोधनाचा चिंताजनक निष्कर्ष असा की, मालमत्तेच्या वाढत्या किमतीमुळे आर्थिक स्थिती बिघडते. त्या उत्पादक गुंतवणूक रोखतात.

इंटरनॅशनल सेटलमेंट्स बँकेच्या सेबॅस्टियन डोअरच्या २०१८ च्या शोधनिबंधानुसार, ज्या अमेरिकन कंपन्यांकडे जास्त मालमत्ता आहे त्यांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त कर्ज आणि भांडवल मिळाले आहे आणि ते कमी उत्पादक आहेत. त्याचा परिणाम स्पेनमध्येही दिसून आला. गेल्या वर्षी बार्सिलोना युनिव्हर्सिटीचे सर्जी बास्को, बँक ऑफ स्पेनचे लोपेझ रॉड्रिग्ज, एनरिक बेनिटो यांच्या एका शोधनिबंधात असे दिसून आले की, ज्या उत्पादक कंपन्यांकडे जास्त मालमत्ता आहे त्यांना इतर कंपन्यांपेक्षा जास्त बँक कर्ज मिळाले.

मालमत्तेच्या वाढत्या मूल्यांमुळे उत्पादक कर्ज कमी होते. अलीकडील संशोधन सूचित करते की, चीनमधील जमिनीच्या चढ्या किमतीमुळे बँकांचे कर्ज जमिनीशी संबंधित बांधकामांवरून नोंदणीकृत कंपन्यांच्या संशोधन आणि इतर कामांकडे वळले आहे. १७२ चिनी शहरांमधील संशोधनात निष्कर्ष निघाला की, मालमत्तेच्या किमतीत ५०% वाढ झाल्याने कर्जाची किंमत वाढली. गुंतवणूक आणि उत्पादकता घसरली. यामुळे कंपन्यांच्या उत्पादकतेत ३५% घट झाली.

बातम्या आणखी आहेत...