आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजर आपण वाहन मालक असाल तर ही आपल्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार वाहन खरेदी करताना वाहन मालक हे बँक खाते किंवा मालमत्तेप्रमाणे नॉमिनी म्हणजेच उत्तराधिकारी नियुक्त करू शकणार आहे. त्यामुळे आता वाहन मालकाच्या निधनानंतर पुढील नॉमिनी व्यक्तीच्या नावावर वाहन हस्तांतरित करणे सुलभ जाणार आहे. मंत्रालयाने नुकतेच नव्या नियमांबाबत अधिसूचना जारी केल्या आहेत.
नंतर नॉमिनींची नेमणूक करता येईल का?
होय. सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार वाहनधारक नोंदणीनंतर ऑनलाईन अर्जातून उमेदवाराची नेमणूक करू शकतात. विशेष म्हणजे आतापर्यंत उमेदवाराची नेमणूक करताना बरीच अडचण येत असून यासाठी संपूर्ण देशात वेगळी प्रक्रिया होती.
नॉमिनीचे कोणतेही ओळखपत्र द्यावे लागतील का?
नवीन नियमांनुसार वाहनधारकाने नॉमिनीची नेमणूक करताना ओळखपत्रही सादर केले पाहिजे. कारण त्यामुळे वाहन हस्तांतरित करताना नॉमिनीचे ओळख पटण्यास मदत होते.
नॉमिनीला वाहन केव्हा हस्तांतरित होईल?
अधिसूचनेनुसार, वाहन मालकाच्या मृत्यूच्या 30 दिवसांच्या आत मृत्यूची नोंद नोंदणी प्राधिकरणाकडे करावी लागेल. दरम्यान, यात वाहन मालकाच्या मृत्यूच्या 3 महिन्यांच्या आत वाहन हस्तांतरणासाठी नॉमिनीला फॉर्म -31 सादर करावा लागेल. विशेष म्हणजे या कालावधीत नॉमिनी वाहनांचा स्वतः वापर करु शकतो.
नॉमिनीला बदलता येऊ शकते का?
होय. नवीन नियमांनुसार वाहनधारक कोणत्याही वेळी नॉमिनीला बदलू शकतो.
शेअरींगवर वाहन कसे हस्तांतरित होईल?
नवीन नियमांनुसार, घटस्फोट किंवा विभक्त झाल्यास वाहन मालकाला आपला नॉमिनी बदलता येणार आहे. यासाठी मान्यताप्राप्त स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) अंतर्गत अर्ज सादर करावे लागेल. विशेष म्हणजे या बदलानंतर देशभरात वाहन हस्तांतरणाची एकसमान प्रक्रिया होईल.
जुन्या प्रक्रियेमध्ये काय समस्या होती?
देशात सध्या असलेली वाहन मालक हस्तांतरणाची प्रक्रिया अवघड असून देशभरात वेगवेगळी आहे. यामुळे हस्तांतरण करण्यासाठी संबंधित विभागात वारंवार चकरा मारव्या लागत होत्या. याव्यतिरिक्त, वाहन मालकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला त्याचा ओळखपत्र सादर करावा लागत होता.
मसुदा बदल केव्हा जारी करण्यात आले?
रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने 27 नोव्हेंबर 2020 रोजी वाहन हस्तांतरणासाठी नॉमिनीच्या नियुक्तीशी संबंधित बदलांचा आराखडा जारी केला होता. दरम्यान, मंत्रालयाने सर्व भागधारक आणि सर्वसामान्यांकडून यावर सूचना मागितल्या होत्या. त्यामुळे संबंधित सूचनांवर विचार केल्यानंतर मंत्रालयाने याबाबतम अंतिम अधिसूचना जारी केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.